1 / 8देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कालच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र दिवसभरातील मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली आहे. गुरुवारी देशात 2,59,551 नव्या रुग्णांची भर पडली असून 4209 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी 3,57,295 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.2 / 8 बुधवारच्या तुलनेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 953 ने कमी झाली आहे. बुधवारी देशात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती तर 3874 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 3 / 8भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 वर गेला आहे. देशात 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 91 हजार 331 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 30 लाख 27 हजार 925 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.4 / 8 देशात गुरुवारपर्यंत 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी एकाच दिवशी देशात 14 लाख 82 हजार 754 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. आतापर्यंत 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 5 / 8आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.6 / 8महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सामान्यांसह यंत्रणासाठी दिलासा देणारी बाब आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाला हरविलेल्या रुग्णांची संख्या 50 लाखांच्या घरात पोहोचली आहे. राज्यात दिवसभरात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण 50 लाख 26 हजार 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.7 / 8 सध्या 3 लाख 83 हजार 253 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात गुरुवारी 29 हजार 911 रुग्ण आणि 738 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 54 लाख 97 हजार 448 झाली असून मृतांचा आकडा 85 हजार 355 आहे. 8 / 8आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 21 लाख 54 हजार 275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.09 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 29 लाख 35 हजार 409 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 21 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.