1 / 8देशात आलेली कोरोनाची भयंकर दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज देशात तीन लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.2 / 8येत्या काही महिन्यांत भारतात कोरोनाच्या आणखी लाटा येतील. त्यामुळे देशापुढील समस्या वाढतील, असं सौम्यानाथन म्हणाल्या. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढील ६ ते १८ महिने अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.3 / 8विषाणू स्वत:ला किती विकसित करतो, त्यावरून तो किती काळ टिकणार ते ठरतं, असं स्वामिनाथन यांनी 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 4 / 8विषाणूच्या व्हेरिएंट्सविरोधात लसींची क्षमता आणि लसींमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टाकते, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे, असं सौम्यानाथन म्हणाल्या.5 / 8या घातक महामारीचा नक्कीच अंत होईल याची आम्हाला कल्पना आहे. २०२१ च्या अखेरपर्यंत जगातील जवळपास ३० टक्के लोकसंख्येचं लसीकरण अपेक्षित होईल अशी अपेक्षा आहे, असं सौम्यानाथन यांनी सांगितलं.6 / 8२०२१ च्या अखेरपर्यंत ३० टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालेलं असेल. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल. २०२२ मध्ये लसीकरणाला वेग देता येईल, असं त्या म्हणाल्या.7 / 8आपण महामाराच्या एका टप्प्यातून जात आहोत. अजून अनेक महत्त्वाचे टप्पे शिल्लक आहेत. पुढील ६ ते १२ महिन्यातील आपली कामगिरी निर्णायक ठरेल. हा काळ आपल्यासाठी कठीण असेल, असं स्वामिनाथन यांनी सांगितलं.8 / 8कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि महामारीला समूळ नष्ट करण्यासाठी योजना आखावी लागेल. लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि कोरोना प्रादुर्भावामुळे तयार होणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमीत कमी ८ महिने टिकते, अशी माहिती त्यांनी दिली.