शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: पंतप्रधान मोदी त्याचे फॉलोअर, टॅग करूनही मदत मिळाली नाही; कोरोनामुळे जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 2:37 PM

1 / 8
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
2 / 8
एप्रिलमध्ये कोरोनानं देशात वेगानं हातपाय पसरले आहेत. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळले. त्यानंतर हा आकडा सातत्यानं वाढत गेला. १५ एप्रिलला देशात प्रथमच २ लाख रुग्णांची नोंद झाली. २२ एप्रिलला देशात पहिल्यांदाच ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आज म्हणजेच १ मे रोजी देशात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.
3 / 8
कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियावर तर सध्या केवळ मदतीचं आवाहन करणारे मेसेजच दृष्टीस पडत आहेत. ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर, बेडची उपलब्धता याबद्दल विचारणाऱ्या मेसेजचा सोशल मीडियावर अक्षरश: पाऊस पडत आहे.
4 / 8
उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात वास्तव्यास असलेल्या अमित जैसवाल जैन यांनीदेखील ट्विटरवरून मदतीचं आवाहन केलं. जैन यांच्यावर मथुरेतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते.
5 / 8
अमित जैन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करायचे. मदतीचं आवाहन करताना जैन यांनी नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटमध्ये टॅग केलं होतं.
6 / 8
ट्विटरवर अमित जैन यांचे ५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. २५ एप्रिलला त्यांनी ट्विट करून मदतीचं आवाहन केलं. 'मी अमित जैसवाल यांची बहिण सोनू आहे. आम्हाला रेमडेसिविर आणि उपचारांची व्यवस्था करणं जमत नाहीए. ते (अमित जायसवाल जैन) नयती रुग्णालय मथुरामध्ये उपचार घेत आहेत. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही,' असं ट्विट जैन यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलं होतं.
7 / 8
अमित जैन यांच्या ट्विटमध्ये PMOIndia, narendramodi, myogiadityanath यांना टॅग करण्यात आलं होतं. २५ एप्रिलला आणखी एक ट्विट करण्यात आलं. कृपया मदत करा. खूप तातडीची गरज आहे, असं आवाहन करण्यात आलं. त्यातही त्यांनी पीएमओ, मोदी आणि योगींच्या ट्विटर हँडलला टॅग केलं होतं.
8 / 8
नरेंद्र मोदी, पीएमओ, योगी आदित्यनाथ यांना दोनवेळा टॅग करूनही अमित जैन यांना मदत मिळाली नाही. कोरोनामुळे जैन यांची प्राणज्योत मालवली. आता त्यांनी बहिण सोनू आईचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथTwitterट्विटर