शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोना पॉझिटिव्ह आईच्या स्तनपानातून बाळाला संसर्ग होऊ शकतो का?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 5:47 PM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 37 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापुढे अनेक प्रगत देशही हतबल झाले आहेत.
2 / 14
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
3 / 14
कोरोना पॉझिटिव्ह आई तिच्या बाळाला स्तनपानाद्वारे संक्रमित करू शकते की नाही यावर लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी नुकतेच अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे.
4 / 14
स्तनपानाद्वारे संक्रमित महिलेकडून तिच्या बाळामध्ये कोरोनाचं संक्रमण झाल्याचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पेडियाट्रिक रिसर्च या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध करण्यात आला आहे.
5 / 14
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आईच्या दुधात कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल फारच कमी प्रमाणात आढळले आहेत. या मटेरियलमुळे व्हायरस मल्टीप्लाय होऊन स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमित करू शकतो. मात्र या संदर्भात कोणतेही वैद्यकीय पुरावे आढळले नाहीत.
6 / 14
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या संशोधनात 110 महिला वॉलेंटियर्स आईच्या दुधाची तपासणी केली. या मातांनी त्यांचे नमुने विद्यापीठाच्या संशोधनासाठी दिले होते. यातील 65 महिलांना कोरोनाची लागण झाली होती.
7 / 14
9 महिलांमध्ये व्हायरसची लक्षणे होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. याशिवाय 36 महिला अशा होत्या ज्यांची लक्षणे असूनही त्यांची कोरोना चाचणी झाली नाही. संशोधनाच्या दुसऱ्या टप्प्यात संशोधकांनी या 7 महिलांकडून पुन्हा आईच्या दुधाचे नमुने घेतले.
8 / 14
संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ पॉल क्रोगस्टाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आईचे दूध हे लहान मुलांसाठी पोषणाचा एक उत्तम स्रोत आहे. संशोधनात आम्हाला असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत की कोविड-19 ची लागण झालेल्या मातांच्या आईच्या दुधात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे.'
9 / 14
बाळांना संसर्ग झाल्याचा कोणताही पुरावा नाही, जे सूचित करते की त्यांना स्तनपानाचा धोका नाही. त्यामुळे जरी आई कोरोना संक्रमित असेल तरी मुलांना दूध पाजायला विसरू नका. आईचं दूध मुलाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.
10 / 14
महिलांनी मुलांना स्तनपान करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. मुलाला कुशीत घेण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूच्या वस्तू निर्जंतुक करा, साबण-पाणी किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करा. डबल मास्क घाला, फेस शील्ड वापरा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
11 / 14
जगभरात आता प्रथमच हर्बल धूप कोरोना व्हायरसपासून संरक्षण करणार आहे. एअरवैद्य असं या हर्बल धूपचं नाव आहे. हर्बल धूप घरीच जाळल्याने कोरोना संसर्गाचा धोका तर कमी होतोच, पण घरात कोरोनाचा रुग्ण असल्यास इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही टळतो.
12 / 14
धूपमुळे कोरोनाचा संसर्ग रुग्णाच्या फुफ्फुसात पोहोचत नाही. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर प्रीती छाबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूप पद्धत ही वैदिक काळापासून वापरली जात आहे, प्रत्येकाला सर्व औषधी वनस्पतींची माहिती नसल्यामुळे, त्यांच्यासाठी एअरवैद्य धूप प्रभावी आहे.
13 / 14
बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) ही उदबत्ती तयार केली असून जगात प्रथमच धूप पद्धतीवर संशोधन केल्यानंतर एअरवैद्य तयार करण्यात आला आहे. एअरवैद्यमध्ये कडुनिंब, हळद, लेमनग्रास, तुळस, मोहरी, चंदन, मेंदी, लोबन धूप, कापूर यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
14 / 14
एकूण चार प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून आले आहेत जे अँटी-व्हायरस, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबियल आणि इम्युनिटी एन्हान्सर आहेत. जे कोरोना व्हायरसवर काम करतात. तो हवेतील व्हायरस निष्क्रिय करतो, ज्यामुळे कोविडचा प्रसार कमी होतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या