1 / 11भारतात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४ लाख ३ हजार ७३८ नवे रुग्ण नोंद झाले, तर ४ हजार ९२ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंची संख्या २ लाख ४२ हजार ३६२ तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी २२ लाख ९६ हजार ४१४ झाली आहे. 2 / 11केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ३७ लाख ३६ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १६.७६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी ही ८२.१५ आहे. आतापर्यंत १ कोटी ८३ लाख १७ हजार ४०४ कोरोना रुग्ण तर २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४४४ जण बरे झाले. 3 / 11मृत्यूचा दर १.०९ टक्के आहे. देशात सात ऑगस्ट, २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती तर या महिन्यात ४ तारखेला तिने २ कोटींचा टप्पा ओलांडला. ८ मे रोजी १८ लाख ६५ हजार ४२८ नमुन्यांची तपासणी केली गेली.4 / 11मास्क, व्हॅक्सिन आणि सोशल डिस्टन्सिंग हेच केवळ तुम्हाला कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतात. मात्र या काळात कोरोनापासून वाचण्यासाठी लोकं घरबसल्या काही उपाय करत आहे. 5 / 11सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. यापैकीच व्हायरल झालेली एक गोष्ट म्हणजे जास्त चहा प्यायल्याने कोरोनाचं संक्रण होत नाही. 6 / 11सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली जात आहे, ज्यामध्ये हेडलाइनमध्ये असं म्हटलं आहे की, 'खूप चहा प्या आणि पाजा, चहा पिणाऱ्यांसाठी खूशखबर'. या बातमीत असं म्हटलं आहे की चहा पिणारे कोरोना संक्रमणापासून वाचू शकतात.7 / 11 काही लोक सोशल मीडियावर असा देखील दावा करत आहेत की, चीनच्या रुग्णालयांनी कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना दिवसातून तीन वेळा चहा देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा देखील झाल्याचा दावा केला जात आहे. 8 / 11मेसेजमध्ये अमेरिकेतील सीएनएन न्यूज चॅनेलचा हवाला देत असं म्हटलं आहे की, चीनमधील कोरोना विषाणू संदर्भात विशेषज्ज्ञ त्यांच्या मृत्यूआधी असं सांगून गेले आहेत की, Methylxanthine, Theobromine आणि Theophylline हे केमिकल कोरोना विषाणूला मारू शकतात. हे तीनही केमिकल चहामध्ये आढळून येतात.9 / 11मात्र केंद्र सरकारकडून PIB फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा दावा फेटाळण्यात आला आहे. या दाव्यामागे कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही आहे की चहामुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोता कमी केला जाऊ शकतो, असं पीआयबीनं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे.10 / 11 कोरोना आजाराची बरीच लक्षणे सांगितली जातात. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, उलटी ही लक्षणे ऋतू बदलाच्या काळातही दिसून येतात. सध्या शहारांप्रमाणेच ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक व्याधींनीही ग्रासले आहे. आजीबाईच्या बटव्यात लहानसहान आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, साली आणि खोडांच्या भागांपासून आरामदायी रामबाण उपाय आहेत. मात्र हे फक्त इम्युनिटी वाढीसाठी उपयोगी असतात.11 / 11गुगलवर सर्च केल्यावर कोणत्या वनस्पतींपासून कशा प्रकारचा फायदा होतो, याविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी निर्बंध लागू असून, शाळांना सुटी, तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे.