भय इथले संपत नाही! एकाच रुग्णाला Black आणि Green Fungus ची लागण; रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 3:37 PM1 / 11देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,03,16,897 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,566 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 907 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 11कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,97,637 लोकांना जीव गमवावा लागला आहे. ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. 3 / 11काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. 4 / 11देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये एकाच रुग्णामध्ये ब्लॅक आणि ग्रीन फंगस आढळून आल्याची घटना समोर आली आहे. रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. 5 / 11डॉक्टर प्रशांत रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर कार्तिकेयन आर. यांना एप्रिलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती. चेहरा जड वाटणं, डोकं दुखणं अशा प्रकारचा त्रास जाणवू लागला. त्यांनी तातडीने बंगळुरूमधल्या बीजीएस ग्लेनीग्लस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यांच्याकडे उपचारांसाठी विचारणा केली. त्यांना तपासल्यानंतर डॉ. रेड्डी यांना हा प्रकार समजला.6 / 11कार्तिकेयन यांची तपासणी केल्यानंतर डॉ. रेड्डी यांना ब्लॅक फंगसची लक्षणं जाणवली. ब्लॅक फंगस असेल या अंदाजाने त्यांनी तपासण्या सुरू केल्या. कार्तिकेयन यांच्यामध्ये फंगसचं संक्रमण दिसून आलं. पण हे वेगळंच प्रकरण असल्याचं ड़ॉक्टरांना जाणवलं. 7 / 11रेड्डी यांच्यामते सामान्यपणे म्युकोरमायकोसिसमध्ये काळ्या रंगाचे क्रस्ट फॉरमेशन दिसून येतात. पण कार्तिकेयन यांच्या सायनसमध्ये वेगळ्या प्रकारचे घटक दिसत होते. त्याचे नमुने त्यांनी तातडीने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. 8 / 11लॅबमध्ये नमुने तपासल्यानंतर कार्तिकेयन यांच्यामध्ये ब्लॅक आणि ग्रीन फंगस असे दोन्ही घटक दिसून आले. यानंतर सध्या रुग्णावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 11देशातील अनेक शहरांमध्ये ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. 10 / 11धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. 'म्युकोरमायकोसिस' असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. 11 / 11'ब्लॅक फंगस' म्हणजेच 'म्युकोरमायकोसिस' हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications