CoronaVirus News India reaches pre lockdown position death rate decreased
CoronaVirus News: भारत लॉकडाऊनआधीच्या स्थितीत पोहोचला; कोरोनाची 'ही' आकडेवारी देतेय दिलासा By कुणाल गवाणकर | Published: October 26, 2020 3:53 PM1 / 10देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे ४५ हजार १४९ नवे रुग्ण आढळून आले.2 / 10देशातील कोरोना बाधितांच्या एकूण संख्येनं ७९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरात देशात ४८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.3 / 10२४ तासांत मृत्यूमुखी पडत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहिल्यास भारत लॉकडाऊनच्या आधीच्या स्थितीत पोहोचला असल्याचं म्हणता येईल.4 / 10देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दीड टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. २२ मार्चनंतर प्रथमच कोरोना मृत्यूदरात इतकी घट झाली आहे.5 / 10देशातील बरीचशी राज्य कोरोना संकटातून बाहेर येत असल्याचंही आकडेवारी सांगते. देशातील १४ राज्यं/केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूदर १ टक्क्यापेक्षा कमी आहे. 6 / 10देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७९ लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत १.१९ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.7 / 10देशात आतापर्यंत ७१ लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ७१ लाखांच्या पुढे गेली आहे.8 / 10देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.9 / 10देशात सध्याच्या घडीला ६.५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 10 / 10आयसीएमआरनं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १० कोटी ३४ लाख ६२ हजार ७७८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सध्याच्या घडीला दिवसाला ९ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या सुरू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications