शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : कोरोनाचा विस्फोट! '... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:09 AM

1 / 16
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून आता ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
2 / 16
जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 27 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देश व्हायरस पुढे हतबल झाले आहे.
3 / 16
तब्बल 91 देशांमध्ये आता ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. मात्र युरोपमध्ये तो अत्यंत वेगाने होत आहे. यामुळेच जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांना यातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
4 / 16
भारतात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशसह 12 राज्यांमध्ये आतापर्यंत 113 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून लोकांना सतर्क राहण्याच आवाहन करण्यात येत आहे.
5 / 16
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती देखील त्यांनी यावेळी सांगितली.
6 / 16
डॉ. व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनमध्ये गेल्या दोन दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि भारतातील परिस्थिती यांची तुलना करत चिंता व्यक्त केली आहे. निष्काळजीपणा अत्यंत घातक ठरू शकतो असं म्हटलं आहे.
7 / 16
'जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरू लागलेल्या कोरोनाचा आवाका पाहिला आणि तसाच रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाला, तर देशात दिवसाला तब्बल 14 लाख कोरोना रुग्ण सापडतील' असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.
8 / 16
'ओमायक्रॉन घातक ठरत असल्याची अद्याप ठोस आकडेवारी हाती आलेली नसली तरी अजूनही हा प्रकार पूर्णपणे समजायचा आहे. त्यामुळेच अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.'
9 / 16
'ओमायक्रॉनची सौम्य लक्षणं जाणवतात मात्र हा अत्यंत वेगाने पसरत आहे' असं देखील पॉल यांनी म्हटलं आहे. आफ्रिका आणि युरोप प्रमाणे जर कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड मोडला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होईल.
10 / 16
भारतात शुक्रवारच्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचे 113 रुग्ण आहेत. एकूण 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 26 ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
11 / 16
महाराष्ट्रात 40, दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, तेलंगणा 8, कर्नाटकमध्ये 8, गुजरात 7, केरळमध्ये 7 तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.
12 / 16
ब्रिटनच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत एकूण 94 हजार 45 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याने आता ब्रिटनमधील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 11 लाख 90 हजार 354 इतकी झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 16
ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरातील अनेक देशात आढळून आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेत देखील भर पडली आहे. मास्क लावा, सोशल डिस्टंसिंगसह कोरोना नियमावलीचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे.
14 / 16
अमेरिकेमध्ये तब्बल 78 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोरोना हा वृद्धांसाठी काळ ठरत असल्याचं समोर आलं आहे.
15 / 16
वृद्ध लोकांसाठी कोरोना अधिक खतरनाक आणि जीवघेणा आहे. आठ लाख कोरोना मृतांपैकी जवळपास 75 टक्के म्हणजेच सहा लाख लोक हे 65 वर्षांवरील आहेत. यातून कोरोना किती घातक असल्याचं स्पष्ट होत आहे.
16 / 16
अमेरिकेतील तब्बल 20 कोटींहून अधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर हा दिला जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत