CoronaVirus News : kanpur city medicine drdo made medicine of coronavirus vrd
CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:35 PM1 / 11कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असला तरी लवकरच एक दिलासादायक बातमी येऊ शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ)नं एक औषध विकसित केलं आहे. 2 / 11ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाची चाचणी रुग्णांवर घेण्यास मान्यता दिली आहे.3 / 11डीआरडीओने उत्तर प्रदेश सरकारकडे किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज (केजीएमयू) लखनऊ, गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेज (जीएसव्हीएम) कानपूर आणि बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथील वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मागितली होती.4 / 11सरकारने DRDOला केजीएमयू आणि जीएसव्हीएममध्ये चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. 5 / 11राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात डीआरडीओने म्हटले आहे की, या औषधाची सेंटर फॉर सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र हैदराबाद व राष्ट्रीय विषाणु संस्थान पुण्यात या औषधाची चाचणी घेण्यात आली आहे. 6 / 11हे औषध विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचंही सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री सुरेश खन्ना यांनी केजीएमयू आणि जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजला क्लिनिकल चाचणीसाठी परवानगीचे पत्र पाठवले आहे. 7 / 11आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या नैतिक समितीची परवानगी मिळताच रुग्णांवर औषधाची चाचणी घेण्यात येणार आहे.8 / 11रुग्णांवर औषधाच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणा-या टीमच्या मुख्य वैज्ञानिकानं महाविद्यालयाच्या नैतिक समितीला प्रस्ताव पाठविला आहे.9 / 11कोरोनाच्या गंभीर रग्णांवर अॅनेस्थेसिया विभागप्रमुखांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. म्हणूनच त्याच्यावर औषधांच्या चाचण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना रुग्णावर होणार्या दुष्परिणामांपर्यंत औषधाचा अभ्यास करावा लागतो.10 / 11डीआरडीओने औषध निर्मितीची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅब हैदराबादला दिली आहे. वैद्यकीय चाचणीचे काम नवितास लाइफ सायन्सेसकडे सोपविण्यात आले आहे, जे केजीएमयू आणि जीएसव्हीएमशी संपर्क साधतील.11 / 11डीआरडीओने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे शोधली आहेत. त्याच्या डी-कोडिंग अभ्यासाला सरकारची परवानगी मिळाली आहे. रुग्णांवर चाचणी घेण्यापूर्वी महाविद्यालयाच्या नैतिक समितीकडे मान्यता मागण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications