CoronaVirus News : संकटं संपता संपेना! भारतात सापडला ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट BA.2.75; WHO ने केलं अलर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 3:23 PM1 / 12कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 12कोरोनाच्या संकटात आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. भारतात ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट BA.2.75 सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अलर्ट केलं आहे. 3 / 12भारतासह इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचा एक नवीन सब व्हेरिएंट आढळतो आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संस्थेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.4 / 12'गेल्या दोन आठवड्यात कोरोनाच्या जागतिक स्तरावर नोंदवलेल्या केसेसेमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोप आणि अमेरिकेत, बीए 4 आणि बीए 5 या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढते आहे.'5 / 12'भारतासह इतर देशांमध्ये ओमायक्रॉनचा बीए 2.75 हा सब व्हेरिएंट आढळून येत आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहे' असंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 6 / 12ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ओमायक्रॉनच्या हा सब व्हेरिएंट सर्वात प्रथम भारतात आढळून आला होता असं म्हटलं आहे.7 / 12'भारतासोबतच तो इतरही दहा देशांमध्ये आढळून आला आहे. सब व्हेरिएंटमध्ये काही म्यूटेशन बघायला मिळाले आहेत. विशेषता याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये हे बदल आढळून आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत'8 / 12'हा सब व्हेरिएंट रोगप्रतिकार क्षमता कमी करतो का, किंवा हा किती घातक आहे. हे सांगणे सद्या कठीण आहे. आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे' असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 9 / 12जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 55 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,364,785 लोकांचा बळी घेतला आहे.10 / 12जगात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. युरोपीय देशात नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. इटलीमध्ये एका दिवसात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे.11 / 12कोरोनाचा धडकी भरवणारा वेग समोर आला असून इटलीमध्ये गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहे. नव्या रुग्णांचा संख्या 132274 होती तर 94 जणांचा मृत्यू झाला आहे.12 / 12जगभरात सध्या कोरोनाचे दोन कोटींहून अधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचं पुन्हा एकदा म्युटेशन झालं असून आता आणखी एक नवीन सब व्हेरिएंट समोर आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications