CoronaVirus News pets at risk of getting infected with corona virus through their owners
CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांपासून पाळीव प्राण्यांना संसर्ग?, जाणून घ्या कितपत असतो धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 3:36 PM1 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.2 / 15काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन पाळीव मांजरांना तसेच इतरही प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती.3 / 15 कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्यातून पाळीव प्राण्यांना संसर्गाची बाधा होऊ शकते का?, यावरही आता संशोधन करण्यात आलं आहे.4 / 15नेदरलँड्समधील युक्ट्रेट विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनाग्रस्तांच्या घरातील पाळीव श्वान, मांजरी यांच्यातील संसर्गावर संशोधन केले. या संशोधनात पशू वैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून संसर्गबाधित व्यक्तींच्या घरातील श्वान आणि मांजरींची स्वॅब चाचणी केली. 5 / 15रक्तचाचणीतून अँटीबॉडीजही तपासण्यात आल्या. या संशोधनात 196 घरांतील 156 श्वान आणि 154 मांजरींची तपासणी करण्यात आली. पीसीआर तपासणीत सहा मांजरी आणि सात श्वानांना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. 6 / 1531 मांजरी आणि 23 श्वानांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. यूट्रेक्ट विद्यापीठाच्या एल्स ब्रोइंस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित व्यक्तींनी घरातील पाळीव श्वान आणि मांजराच्या संपर्कात येण्यास टाळले पाहिजे.7 / 15ब्रोइंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य चिंता प्राण्यांच्या आरोग्याची नाही. तर, त्यांच्या शरिरात विषाणूने प्रवेश केल्यास हा विषाणू पुन्हा स्वरूप बदलून मानवी शरिरात पुन्हा प्रवेश करण्याचा धोका आहे.8 / 15कोरोनाग्रतांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 13 पाळीव प्राण्यांना लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 15कोरोनाचा पाळीव प्राण्यांना देखील धोका आहे. कोरोनाच्या नवा स्ट्रेनपासून जगभरातील पाळीव प्राणी देखील वाचू शकलेले नाहीत. मात्र आता कोरोनाच्या महाभयंकर संकटात एक दिलासादायक घटना समोर आली आहे.10 / 15पाळीव प्राण्यांनाही कोरोना होऊ नये म्हणून रशियाने चक्क पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची लस तयार केली आहे. त्यामुळे कोरोनापासून पाळीव प्राण्यांचं संरक्षण होणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित रोजेलखोनाजोर या संस्थेने याबाबतची घोषणा केली आहे.11 / 15Carnivac-Cov असं रशियाने तयार केलेल्या लसीचं नाव आहे. रशियाच्या फेडरल सेंटर फॉर अॅनिमल हेल्थने ही लस तयार केली आहे. सुरुवातीच्या ट्रायलमध्ये या लसचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत.12 / 15श्वान, मांजर, बर्फाळ भागात राहणारे कोल्हे, उंदीर, कोल्हा आणि इतर प्राण्यांवर या Carnivac-Cov लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यात आली आहे. ही ट्रायल गेल्यावर्षी ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्याआधारे ही लस प्राण्यांसाठी सुरक्षित आणि संरक्षक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.13 / 15रोजेलखोनाजोरचे उपप्रमुख कॉन्स्टेनटीन सावेनकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीमुळे प्राण्यांना कोणतंही नुकसान होणार नाही. या लसीमुळे प्राण्यांची इम्युनिटी वाढेल. तसेच त्यांच्या शरीरात शंभर टक्के अँटीबॉडीज विकसित होतील.14 / 15अमेरिका आणि फिनलँडमध्येही प्राण्यांसाठी कोरोना लस तयार करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पाळीव प्राण्यांबद्दल लोकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे पाळीव प्राण्यांमध्येही कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.15 / 15श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग माणसांना होण्याचा धोका नाही असं रिसर्चमधून समोर आलं आहे. मात्र काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं याआधी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे आणखी वाचा Subscribe to Notifications