CoronaVirus News risk of corona due to opening of school 3 out of 4 children corona
शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला! 4 पैकी 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह; रिपोर्टने वाढवली पालकांची चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 1:49 PM1 / 15कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल 84 लाखांवर गेला आहे. 2 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. 3 / 15वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.4 / 15शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. 5 / 15शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 4 पैकी 3 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहेत. 6 / 15दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयाने कोरोना संदर्भात दिलेल्या एका रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.7 / 15एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे.8 / 15गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या गाईडलाइन्सनुसार देशातील जवळपास 10 राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे. 9 / 15एम्सच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमित 4 पैकी 3 मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत जी इतर मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. ही मुले सहजपणे दुसर्या मुलास संक्रमित करतात.10 / 15आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 2 नोव्हेंबरपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत. 11 / 15कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 12 / 15एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आंध्र प्रदेशमध्ये 2 नोव्हेंबर रोजी 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांत जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.'13 / 15शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. 14 / 15कर्नाटकमध्येही याआधी परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. 15 / 15जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications