1 / 11देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या घरात आला आहे. 2 / 11कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला गती दिली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहे. 3 / 11कोरोनाची लागण झाल्यावर आपल्या लहानग्यांचं काय होणार, त्यांच्यावर कुठे आणि कसे उपचार केले जाणार याची चिंता पालकांना आहे. याबद्दल डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. 4 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोविड व्यवस्थापन टीमच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असलेल्या डॉ. पॉल यांनी पालकांच्या मनातील भीती काहीशी दूर केली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांनाच लक्ष्य करेल याबद्दल कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नाही, असं पॉल यांनी सांगितलं.5 / 11आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि आकडेवारी यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांनाच असेल असं ठामपणे म्हणता येणार नाही, असं पॉल म्हणाले. मुलांच्या पालकांनी, नातेवाईकांनी लस घेतल्यास लहान मुलांना धोका कमी असेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं.6 / 11लहान मुलांचे पालक, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांनी कोरोना लसीकरण करून घेतल्यास कोरोना विषाणू मुलांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.7 / 11कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेलच असं नाही. कोरोनाच्या दोन लाटांची आकडेवारी पाहता वयस्कर आणि मुलांना कोरोनाचा सारखाच धोका असल्याचं डॉ. पॉल म्हणाले.8 / 11आरोग्य मंत्रालयानं डिसेंबर २०२०-जानेवारी २०२१ या कालावधीत कोरोनाची लागण झालेल्यांची आकडेवारीचा हवाला दिला आहे. वयोगट आणि त्याला असणारा कोरोनाचा धोका याबद्दलचा हा अहवाल आहे. 9 / 11तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांनाच असेल याबद्दलचे कोणतेही पुरावे आपल्याकडे नाहीत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांनाच असेल असं म्हणता येणार नाही, असं दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.10 / 11वयस्कर व्यक्तींचं लसीकरण झाल्यास कोरोनाचा विषाणू लहान मुलांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं.11 / 11कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल याबद्दल कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांनी घाबरू नये, असं आवाहन इंडियन ऍकेडमी ऑफ पीडियाट्रिक्सनं (आयईपी) केलं आहे.