CoronaVirus News US Fighter jets fly over New York to honour health workers battling coronavirus kkg
CoronaVirus News: चारच दिवसांपूर्वी 'या' देशाच्या सैन्यानं कोरोना योद्धांना केला हवाई सलाम By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 3:15 PM1 / 10आपला जीव धोक्यात घालून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सैन्यानं आज अनोखी मानवंदना दिली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली. 2 / 10सकाळी श्रीनगरमधून हवाई दलाच्या विमानांनी फ्लायपास्ट सुरू केला. दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा आणि लखनऊमध्ये लढाऊ विमानांनी फ्लाय पास्ट करत कोरोना योद्ध्यांचे अनोख्या पद्धतीनं आभार मानले.3 / 10श्रीनगर, चंडीगढ, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोईम्बतूर आणि तिरुअनंतपुरममध्ये हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी फ्लाय पास्ट केला.4 / 10सुखोई-३० विमानांनी मरीन ड्राईव्हवर पुष्पवृष्टी करत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यानंतर के. ई. एम आणि कस्तुरबा रुग्णालयांवरदेखील पुष्पवर्षाव करण्यात आला. 5 / 10देशभरातल्या फ्लायपास्टमध्ये हवाई दलाच्या सुखोई-३०, मिग-२९, जग्वार या लढाऊ विमानांनी सहभागी घेतला. याशिवाय सी-१३० वाहतूक विमानदेखील फ्लायपास्टमध्ये सहभागी झालं होतं.6 / 10चारच दिवसांपूर्वी अमेरिकेमध्येही सैन्यानं असाच फ्लायपास्ट केला. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी हा फ्लायपास्ट करण्यात आला. 7 / 10अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २२ एप्रिलला याबद्दलची घोषणा केली होती. अमेरिकन हवाई दलाची थंडरबर्ड्स आणि नौदलाची ब्ल्यू एंजल्स विमानं यामध्ये सहभागी घेतील, असं ट्रम्प म्हणाले होते.8 / 10कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागे देश उभा आहे, हे दाखवण्यासाठी ऑपरेशन अमेरिका स्ट्राँग राबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.9 / 10गेल्या मंगळवारीच न्यूयॉर्कच्या आकाशात सैन्य दलाच्या विमानांनी फ्लाय पास्ट केला. अमेरिकेतील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत.10 / 10अमेरिकन हवाई दलाच्या थंडरबर्ड्स आणि नौदलाच्या ब्ल्यू एंजल्स विमानांनी उड्डाण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानवंदना दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications