Coronavirus: Omicron News Sibling BA1 Rapidly Replacing Delta Variant
Omicron: कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट एकटा आला नाही तर...; वैज्ञानिकांनी दिला सतर्कतेचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 9:38 AM1 / 10डेल्टानंतर आता कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट देशभरात पसरला आहे. परंतु ओमायक्रॉन एकटा नाही तर त्याचं पूर्ण कुटुंब आहे. होय, कोविड पॉझिटिव्ह क्लिनिकल नमुन्याच्या जीनोम सिक्वेंसिंगवर काम करणाऱ्या बायोटेक्नोलॉजीचे वैज्ञानिक याबाबत म्हणाले आहेत. 2 / 10मूळ ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटसोबत त्याचा भाऊ BA 1 वेगाने प्रार्दुभाव पसरत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यात हा डेल्टा व्हेरिएंटची जागा घेत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचे २ भाऊ आहेत. BA2, BA 3. काही क्लिनिकल सॅपल्समध्ये मूळ ओमायक्रॉन व्हेरिएंटच्याजागी BA 1 व्हेरिएंट आढळला.3 / 10मात्र हे सब लीनिएज त्याच कुटुंबातून येतात त्यामुळे अशा सॅंपल्सना ओमायक्रॉन पॉझिटिव्ह मानलं जाईल. सब लीनिएज व्हेरिएंट नसून ते त्या कुटुंबातील सदस्य आहेत. जे मूळ व्हेरिएंटच्या बहुतांश समानता असतात असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.4 / 10याचप्रकारे ओमायक्रॉनच्या कुटुंबातील त्याच्या ३ भावांचा शोध झाला आहे. वैज्ञानिकांना जीनोम सिक्वेंसिंग चाचणीत BA 2 चं अस्तित्व सापडलं आहे. या संशोधनात असलेल्या एका वायरोलॉजिस्टनं सांगितलंय की, सध्या याचं अस्तित्व तुलनात्मकरित्या खूप कमी आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या कुटुंबातील तिसरा सदस्य BA3 आहे की नाही याचा शोध लागला नाही.5 / 10कोरोनाचा ओमायक्रॉन खूप वेगाने संक्रमण पसरवत आहे. अलीकडेच देशात वाढणाऱ्या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन जबाबदार आहे. सध्या बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. मात्र डेल्टाच्या तुलनेने हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ कमी येतेय. 6 / 10INSACOG ने देशभरात सार्स कोव २च्या जीनोम सर्विलांससंबंधी रिपोर्ट तयार केला आहे. त्यात महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांतील जिल्ह्यामधील विस्तृत विश्लेषण समोर ठेवले आहे. विशेष म्हणजे, RTPCR आणि अँन्टिजेन किट ओमायक्रॉन आणि व्हेरिएंटच्या कुटुंबातील ३ सदस्यांमुळे होणाऱ्या संक्रमणाची ओळख पटवण्यात सक्षम आहेत.7 / 10परंतु RTPCR च्या मदतीनं ओमायक्रॉन प्रकरणाच्या तपासावर विश्वास ठेऊ शकत नाही कारण आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, BA 2 सब लीनिएजला RTPCR किटचा वापर करुन ओळखलं जाऊ शकत नाही. कोविडच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे देशात एकूण ३ हजार ६२३ रुग्ण रविवारी आढळले आहेत.8 / 10आरोग्य मंत्रालयाकडून गठीत वैज्ञानिकांच्या टीमकडून देशात कोविड १९ स्ट्रेन आणि जीनोम सिक्वेसिंगवर पाहणी आणि अभ्यास केला जातो. २५ डिसेंबर २०२० मध्ये INSACOG ची स्थापना झाली. ही संस्था देशातील विविध राज्याशी जोडलेल्या २८ राष्ट्रीय लॅबशी सलग्न आहे. 9 / 10देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्या मध्यावस्था सुरू आहे. संसर्गाच्या प्रसाराचा वेग वाढत राहिला तर तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव डॉ. रवी मलिक यांनी व्यक्त केली आहे.10 / 10कोरोनाची तिसरी लाट देशात धडकली असून सरकारकडून निर्बंधासारखे पाऊलं उचलण्यात आली आहे. आजपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications