शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: ‘’इथून जाऊ द्या, नाहीतर मी मरून जाईन;’’ रुग्णालयाची दुरवस्था पाहून रुग्णाने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 2:37 PM

1 / 6
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल आहे.
2 / 6
दरम्यान, गुजरात सरकार आणि सूरतमधील प्रशासनाने शहरात तयार केलेल्या कोविड-१९ रुग्णालयामधील व्यवस्थेची दुरवस्थेची पोलखोल येथे दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांनी केली असून, या वृ्ताची प्रसारमाध्यमांनी देखील दखल घेतली होती.
3 / 6
सूरत महानगरपालिकेकडून चालवण्यात येत असलेल्या स्मिमेर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेले हंसमुख वाघमसी यांनी एक व्हिडीओ शेअर करून रुग्णालयाती अव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. मला या रुग्णालयातून बाहेर काढा. नाहीतर मी मरून जाईन, अशी विनवणी त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
4 / 6
मी सध्या स्मिमेर रुग्णालयाता उपचार घेत आहे. मात्र येथे कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे. रुग्णालयाला याची माहिती दिल्यावर ते चांगले फोटो आणि व्हिडीओ काढून निघून जात आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून माझ्यावर अत्यंत वाईट परिस्थितीत उपचार सुरू आहेत. कुणीही माझी देखभाल करत नाही आहे. जो तो केवळ आश्वासन देऊन निघून जात आहे. मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा, नाहीतर मी मरून जाईन, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असे हंसमुख वाघमसी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
5 / 6
याबाबत रुग्णाचा मोठा भाऊ हरी याने सांगितले की, माझा भाऊ मला सरकारी रुग्णालयातून दररोज फोन करत आहे. तिथे चांगले उपचार मिळत नसल्याचे सांगत आहे. त्याने मला फोटो पाठवले आहेत. तो सारखा रडतोय. आम्ही आत जाऊ शकत नाही. माझ्या भावावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे. मात्र माझा भाऊ डायमंड फॅक्ट्रीमध्ये ८ ते दहा हजार रुपये पगारावर काम करतो. खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च मला परवडणार नाही.
6 / 6
दरम्यान या प्रकाराबाबत सूरत महानगरपालिकेचे आयुक्त बंछनिधी पानी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आपले कर्मचारी रुग्णालयामध्ये रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करत आहेत. तसेच कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य