Coronavirus places that have been converted into quarantine centers SSS
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 10:16 AM1 / 12भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 2,567 वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगातील 200 हून देशात झाला आहे. 2 / 12भारतात ही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. 3 / 12भारतातील रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे. कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी काही स्टेडियम आणि हॉटेल्सचं रुपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.4 / 12देशभरात अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू असून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच वाढत संसर्ग रोखण्यासाठी अनेक जागा सील करण्यात आली आहेत. हॉटेलपासून स्टेडियमपर्यत रूपांतरित करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरबद्दल जाणून घेऊया.5 / 12रेल्वे आपल्या एसी आणि नॉन-एसी कोचचे रुपांतर आता आयसोलेशन वार्डमध्ये करत आहे. यासाठी रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे.6 / 12देशभरात भारतीय सैन्य 6 क्वारंटाईन सेंटर चालवत आहेत. हिंडन, मानेसर, जैसलमेर, जोधपूर, मुंबई आणि चेन्नईमध्ये ही क्वारंटाईन सेंटर आहेत.7 / 12दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर जवाहरलाल नेहरू स्टेडियमचं रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे.8 / 12उत्तर प्रदेशमधील कांशीराम कॉलनीतील एका रिकाम्या इमारतीचं रूपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. येथे इतर शहरातून आलेल्या रुग्णांना 14 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.9 / 12बालासोर जिल्ह्यातील बिझनेस पार्कचं रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं असून तेथे 1000 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.10 / 12Lemon Tree, Red Fox आणि IBIS या दिल्लीतील तीन हॉटेलचं हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे11 / 12आसामच्या गुवाहाटीमधील सरूसजाई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे.12 / 12पाटणातील 12 हॉटेल्सही क्वारंटाईन सेंटरसाठी निश्चित करण्यात आली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications