Coronavirus: जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव! By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:20 AM
1 / 11 कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था डबघाईला येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. 2 / 11 लॉकडाऊन ४.० चे संकेत देताना त्यांनी देशात लोकल-व्होकल फॉर्म्युला देखील दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढवावी लागेल, केवळ वेग वाढवण्यासाठीच नव्हे तर उंच झेपही घ्यावी लागेल. प्रत्येक भारतीयाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनले पाहिजे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. 3 / 11 पंतप्रधानांनी दिलेल्या या फॉर्म्युलाचा अर्थ असा आहे की, आता भारत पूर्वीपेक्षा इतर देशांवरील आपले अवलंबन कमी करेल. आता देशात, स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देताना त्या त्या भागातील उत्पादित वस्तूंच्या वापरावर भर देण्यात येईल जेणेकरुन चिनी उत्पादनांचे प्रभुत्व कमी होऊ शकेल. पंतप्रधान मोदींनी यासाठी पीपीई किटचेही उदाहरण दिले. 4 / 11 स्थानिक उत्पादनांच्या वापरावर जोर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत हा जगासाठी एक बाजारपेठ आहेत. याठिकाणी सर्वात जास्त मागणी असलेले क्षेत्रही आहे, त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. 5 / 11 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात उत्पादित उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यामागील मुख्य कारण म्हणजे चीनमधील भारताचे मुत्सद्दी संबंध. एकीकडे, संपूर्ण जग कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे आणि आपली अर्थव्यवस्था वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, तर चीन केवळ इतर देशांतील निर्यातीतून मिळवलेल्या पैशातूनच त्यांचे सीक्रेट मिशन राबवण्यात गुंतलं आहे. 6 / 11 कोरोना लढाई दरम्यान चिनी सैन्य एकीकडे लष्करी कवायती सुरू करत आहेत, तर दुसरीकडे शेजारच्या देशांवर लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर उडवून संबंधांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लडाख आणि सिक्कीममध्येही चिनी सैन्य आणि भारतीय सेना यांच्यात तणाव कायम आहे. 7 / 11 चीन कधीकधी एव्हरेस्टवर ५ जी तंत्रज्ञान स्थापित करण्यास सुरवात करतो. अशा परिस्थितीत आशियातील चीनचा वाढता प्रभाव कमी करण्याची क्षमता फक्त भारतामध्ये आहे, कारण तसे न केल्यास भारताच्या सामरिक हितसंबंधांचे नुकसान होईल. 8 / 11 चीन सातत्याने असे प्रकार करत आहे ज्यामुळे आशियाई देशांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण होईल. भारत, बांगलादेश, म्यानमार, तैवान, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या शेजारच्या देशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. 9 / 11 भारतात मोबाईल, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निशिंग, लाइटिंग यासह अनेक देशांतर्गत उत्पादनेही चीनमधून बनून येतात ज्याचा आपण वापर करतो 10 / 11 आशियासह संपूर्ण जगात आपले वर्चस्व राखण्यासाठी चीन आपली उत्पादने भारतात विकून खूप पैसे कमवतो. मुत्सद्दी स्तरावर चीनच्या या हालचालीवर विजय मिळवून भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मंगळवारी लोकल आणि व्होकलचा नारा दिला. 11 / 11 महामारीमुळे उभ्या ठाकलेल्या संकटातून आम्हाला लोकलच वाचवले. लोकल फक्त आमची गरज नाही तर आम्हा सगळ्यांची जबाबदारीही आहे. कोरोनाने आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरींग, स्थानिक पुरवठ्याची साखळी आणि स्थानिक बाजारपेठेचे महत्व समजावून सांगितले आहे. लोकलनेच आमची मागणी पूर्ण केली. आम्हाला याच लोकलने वाचवले असं सांगत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे बाजारपेठेतील चीनचं वर्चस्व कमी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले. आणखी वाचा