शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: देशातील ७० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीजची निर्मिती? ICMR चा रिपोर्ट, महाराष्ट्राला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 9:24 AM

1 / 10
देशातील ७० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या चौथ्या सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे
2 / 10
सामूहिक प्रतिकारशक्ती, अँटिबॉडीजचे सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेशमध्ये ७९ टक्के तर महाराष्ट्रात ते ५९ टक्के आहे. याचे सर्वांत कमी प्रमाण केरळमध्ये ४४.४ टक्के आहे. या सर्वेक्षणासाठी २१ राज्यांमध्ये पाहणी करण्यात आली.
3 / 10
आता राज्यांनी जिल्हानिहाय सिरोप्रिव्हलन्स सर्वेक्षण करावे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. सामूहिक प्रतिकारशक्तीचे प्रमाण राजस्थानमध्ये ७६.२, बिहारमध्ये ७५.९, गुजरातमध्ये ७५.३, छत्तीसगढमध्ये ७४.६, उत्तराखंडमध्ये ७३.१ आहे.
4 / 10
तसेच उत्तर प्रदेशात ७१, आंध्र प्रदेशात ७०.२, कर्नाटकमध्ये ६९.८, तामिळनाडूत ६९.२, ओडिशात ६८.१, पंजाबमध्ये ६६.५, तेलंगणात ६३.१, जम्मू-काश्मीरमध्ये ६३, हिमाचल प्रदेशात ६२, झारखंडमध्ये ६१, पश्चिम बंगालमध्ये ६०.९, हरयाणात ६०.१, आसाममध्ये ५०.३ टक्के आहे.
5 / 10
केरळमध्ये सर्वात कमी सिरोप्रिव्हलन्स आढळून आला. तिथे इतर राज्यांच्या तुलनेत कमी सामूहिक प्रतिकारशक्ती आहे. रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांपैकी निम्मे केरळमधील असतात.
6 / 10
केरळमधील लसीकरणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक आहे. मात्र सामूहिक प्रतिकारशक्तीबाबत केरळ सर्व देशाच्या मागे असल्यामुळे त्या राज्याला अधिक लसींची गरज आहे.
7 / 10
देशात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४३,६५४ नवे रुग्ण आढळले, तर ६४० जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी २९,६८९ नवे रुग्ण आढळले होते, त्यात १३,९६५ रुग्णांची भर पडली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
8 / 10
कोरोनाने आतापर्यंत देशात ४,२२,०२२ जणांचा बळी घेतला आहे. देशातील सध्याच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,९९,४३६ असून, त्यात २४ तासांत १,३३६ जणांची भर पडली. एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.२७ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के.
9 / 10
रुग्ण सकारात्मक निघण्याचे रोजचे प्रमाण मंगळवारी १.७३ टक्के होते ते २.५१ टक्के झाले. एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूचे प्रमाण १.३४ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४४.६१ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे, असेही म्हटले आहे.
10 / 10
अमेरिकेमध्ये एका दिवसात एक लाखाहून अधिक नवे बाधित आढळलेत. अमेरिकेत ३ कोटी ५३ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ९५ लाख जण बरे झाले. या संसर्गाने ६ लाख २७ हजार जणांनी जीव गमावला आहे. तर ५१ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या