coronavirus Researchers in India find evidence of Covid 19 genes in sewage
काय सांगता? गटाराच्या पाण्यात पोहोचला कोरोना; भारतीय संशोधकांनी शोधून काढला By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 7:32 PM1 / 11कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ६७ हजारांवर पोहोचला आहे. 2 / 11जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास त्यात भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता येत्या काही दिवसांत भारत यादीत आणखी वर सरकण्याची दाट शक्यता आहे.3 / 11एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना दुसरीकडे भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं (गांधीनगर) सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू शोधले आहेत.4 / 11अहमदाबाद शहराच्या बाहेर सोडण्यात आलेल्या गटाराच्या पाण्यात संशोधकांना कोरोना विषाणूची जनुकं आढळून आली आहेत. ही जनुकं संक्रमित नव्हती.5 / 11कोरोनाची लागण रोखण्यासाठी संशोधकांनी सांडपाण्याचे नमुने तपासले. त्यावेळी अहमदाबाद शहराच्या बाहेर सोडण्यात आलेल्या गटाराच्या पाण्यात कोरोनाची जनुकं आढळून आली.6 / 11भारताच्या आधी नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि अमेरिकेतील सांडपाण्यात सार्स-कोव-२ विषाणूचे कण आढळून आले आहेत. 7 / 11सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू आढळतो का, यावर जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे. जगातील ५१ प्रतिष्ठीत विद्यापीठ यावर काम करत आहेत. त्यामध्ये आयआयटी गांधीनगरचा समावेश आहे. 8 / 11भविष्यात कोविड-१९ शी संबंधित धोक्याबद्दल जगाला सतर्क करण्याच्या दृष्टीनं विद्यापीठांचं संशोधन सुरू आहे. 9 / 11विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी सांडपाणी महत्त्वाचा घटक आहे. सांडपाण्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत नसल्याचं आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक मनीष कुमार यांनी सांगितलं. 10 / 11पाण्याचं तापमान अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे विषाणूच्या आयुर्मानावर परिणाम होतो, असं कुमार यांनी सांगितलं. 11 / 11आयआयटी गांधीनगरनं ८ मे ते २७ मे दरम्यान सांडपाण्याचे नमुने गोळा केले. यामध्ये गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळानं महत्त्वाची भूमिका बजावली. आणखी वाचा Subscribe to Notifications