दिलासादायक! भारतात कोरोना महामारीचं थैमान कधी थांबणार? वैज्ञानिकांनी सांगितली तारीख.... By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 9:29 AM
1 / 11 कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली जगत आहे. अशात कोविड-१९ बाबत भविष्यवाणी करणारे सरकारचे मॅथमॅटिकल मॉडलिंग एक्सपर्ट प्रोफेसर एम. विद्यासागर म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ७ मे ला पीकवर असेल म्हणजे यावेळी जास्त रूग्ण असतील. त्यामुळे हेल्थ सेक्टरने या तारखेसाठी तयार रहायला हवं. 2 / 11 इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रा. विद्यासागर म्हणाले की, 'जर पूर्णपणे पाहिलं तर या आठवड्याच्या अखेरला कोरोनाच्या केसेस कमी होणं सुरू होईल. कोरोना ७ मे ला पीकवर असेल. इथून कोरोनाच्या केसेस कमी व्हायला लागतील. पण ही लाट वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेळेवर पीकवर असेल. संयुक्त रूपाने पाहिलं तर कोरोनाची लाट एकतर पीकवर आहे किंवा त्याच्या एकदम जवळ आहे'. 3 / 11 प्रा. विद्यासागर यांचा अंदाज जर बरोबर ठरला तर ही देशासाठी मोठी दिलासादायक बाब ठरेल. कारण या आठवड्याच्या अखेर देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकला पार करेल. 4 / 11 प्रा. विद्यासागर म्हणाले की, हे समजून घेण्यासाठी आम्ही साधारण ७ दिवसांचा कालावधी घेतो. कारण पीडितांची संख्या रोज कमी-जास्त होत असते. त्यामुळे आपण केवळ रॉ नंबर्स बघू नये. तर रोजच्या केसेच्या सरासरीवरही लक्ष दिलं पाहिजं. त्यांनी दावा केला आहे की, हे आकडे या आठवड्यात कमी होणं सुरू होईल'. 5 / 11 वेगवेगळ्या राज्यांच्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, 'वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला कोरोना पीकवर असेल आणि त्यानंतर यात घट होताना दिसेल. जसे की महाराष्ट्रात बघायला मिळत आहे'. 6 / 11 ते म्हणाले की, 'दुसऱ्या लाटेची सुरूवात महाराष्ट्रातून झाली होती. जे राज्य महाराष्ट्रापासून दूर आहेत. ते हळूहळू पीकवर येतील आणि त्यांचा डिक्लाइनही स्लो होईल. पण जे राज्य महाराष्ट्राच्या जवळ आहेत तिथे कोरोना लवकर पीकवर असेल आणि धोकाही लवकर कमी होईल'. 7 / 11 प्रा. विद्यासागर म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की, भारतातील एकूण केसेस या आठवड्यात पीकवर असतील. जास्तीत जास्त पुढील १० ते १५ दिवसात भारतातील प्रत्येक राज्य पीकवर असेल आणि तेथूनच केसेस कमी होणं सुरू होईल'. 8 / 11 पीकवर आल्यावर कोरोनाची दुसरी लाट संपायला किती वेळ लागेल? यावर विद्यासागर म्हणाले की, 'जर आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की, गेल्यावेळी याचा वेग कमी होता. पहिल्या लाटेला पीकवर येण्यासाठी साडे तीन महिने लागले होते आणि या केसेस तेवढ्याच हळू वेगाने खाली आल्या होत्या'. 9 / 11 दुसऱ्या लाटेवर नजर टाकली तर दिसतं की, १ एप्रिलला आपल्याकडे ७५ हजार केसेस होत्या. पण ठीक एक महिन्यानंतर आपण ४ लाखांचा आकडा पार केला. आम्हाला आशा आहे की, दुसरी लाट जेवढ्या वेगाने वर गेली तेवढ्याच वेगाने खाली येईल. प्रा. विद्यासागर म्हणाले की, मे च्या अखेरपर्यंत भारतात साधारण १.२ लाख केसेस दररोज असं चित्र असेल. इथे याचा अर्थ असा नाही की, कोरोनाच्या केसेस एकदम शून्य होतील. 10 / 11 अशोका यूनिव्हर्सिटीचे बायोलॉजीचे प्रा. गौतम मेनन यांचा अंदाज आहे की, कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या दुसऱ्या आठड्यात म्हणजे या महिन्याच्या मध्यात पीकवर असेल. ब्राउन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन डॉ. आशीष झा यांना प्रा. विद्यासागर यांचा अंदाज योग्य वाटत नाही. 11 / 11 डॉ. आशीष झा म्हणाले की, कोरोनाचा डिक्लाइन योजनांवर अवलंबून आहे. जर तुमची योजना प्रभावशाली असेल तर वाढणाऱ्या केसेस कंट्रोल केल्या जाऊ शकतात. अशात स्थितीत केसेस वेगाने कमी होतील. जर असं झालं नाही तर अनेक देशांचा अनुभव हे सांगतो की, पीकवर असल्यावर हळुवार केसेस कमी होतात. ज्यात काही महिन्यांचा वेळ लागतो. आणखी वाचा