coronavirus: ... so Kerala gets highest dose of coronavirus vaccine than most populous states
coronavirus:...म्हणून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांपेक्षा केरळला मिळणार कोरोनावरील लसीचे सर्वाधिक डोस By बाळकृष्ण परब | Published: December 14, 2020 10:40 AM1 / 6कोरोना विषाणूचा सर्वांधिक फैलाव झालेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून व्यापक लसीकरणाची मोहीम हाती घेण्याची योजना तयार करण्यात आली आहे. 2 / 6यानुसार कोरोनाच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासह ज्येष्ठ नागरिक असे मिळून जुलैपर्यंत २५ ते ३० कोटी नागरिकांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 3 / 6कोरोना लसीच्या वितरणामध्ये ज्या राज्यात वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासह ज्येष्ठ नागरिक अशा व्यक्तींची संख्या अधिक असेल अशा राज्यांना कोरोनावरील लसीचा अधिक कोटा मिळणार आहे. उत्तर प्रदेशात ५० वर्षांवरील अधिक व्यक्ती आहेत. तर महाराष्ट्रात हायपरटेंशन आणि पश्चिम बंगालमध्ये डायबिटीसचे अधिक रुग्ण आहेत. तर केरळमध्ये एक तृतियांश लोकसंख्या ५० वर्षांवरील आहे. तसेच हायपरटेंशन आणि डायबिटिजच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.4 / 6उत्तर प्रदेशात १५ टक्के लोकसंख्या ५० वर्षांवरील आहे. मात्र राज्याची लोकसंख्या एवढी अधिक आहे की त्यामुळे त्यांना सर्वाधिक लसीचा पुरवठा होईल. त्यानंतर सर्वाधित ५० वर्षांवरील लोक महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये राहतात. मात्र ज्या राज्याला कोरोनाच्या लसीचे सर्वाधिक डोस लागतील त्या राज्याचे नाव आहे केरळ. 5 / 6नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या २०१९-२० च्या आकडेवारीनुसार केरळच्या २५.३ टक्के लोकसंख्या डायबिटीस आणि १३.७ टक्के लोक हायपरटेंशनने ग्रस्त आहे. तसेच राज्यात ३३ टक्के लोक ५० वर्षांवरील आहेत. त्यामुळे केरळला अधिक डोसची गरज भासणार आहे. 6 / 6केंद्र सरकार ५० वर्षांवरील लोकांना कोरोनाविरोधातील लसीकरण करण्याची तयारी करत आहे. तसेच कोविड व्हॅक्सिनचे वितरण राज्यांमध्ये अधिक होणार आहे जिथे ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. सरकारी लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यानंतर लष्कर, पोलीस, स्थानिक संस्थांमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications