coronavirus: ... so the Oxford vaccine trial in India was postponed for a week
coronavirus: ...म्हणून आठवडाभरासाठी टळली ऑक्सफर्डच्या लसीची भारतातील चाचणी By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 4:22 PM1 / 7गंभीर संकट बनून संपूर्ण जगास वेठीस धरणाऱ्या कोरोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सध्या जगभरात चाचण्या सुरू आहेत. मात्र यामध्ये सर्वाधिक अपेक्षा ही ऑक्सफर्डच्या लसीकडून करण्यात येत आहे. जगातील अनेक देशांमध्ये ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी सुरू आहे. 2 / 7भारतातही या लसीची वैद्यकीय चाचणी सुरू होणार आहे. मात्र चंदिगडमधील पीजीआयएमईआरमध्ये होणारी ऑक्सफर्डच्य लसीची चाचणी एका आठवड्यासाठी टाळण्यात आली आहे. ही चाचणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार होती. 3 / 7दरम्यान, या लसीची चाचणी आठवडाभरासाठी लांबणीवर पडण्यामागे सुरक्षेबाबतची काही कारणं असल्याचे सांगण्यात येत आहे. सेफ्टी अॅप्रुव्हल न मिळाल्याने या लसीची चाचणी आठवडाभरासाठी टाळण्यात आली आहे, असे डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने आएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. या चाचणीसाठी १०० जणांची निवड करण्यात आली आहे. 4 / 7कोरोना लसीच्या चाचणीसाठी होत असलेल्या उशिरामुळे स्वयंसेवकांची भरतीही थांबवण्यात आली आहे. आतापर्यंत ४०० जणांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. त्यापैकी २५३ जणांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. पीजीआयएमईआरमधील लसीच्या ट्रायल शेड्युलचे प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर प्रोफेसर मधू गुप्ता यांनी सांगितले की, सध्या ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीसाठीच्या स्वयंसेवकांची भरती स्थगित करण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाकडून पहिल्या १०० स्वयंसेवकांच्या सुरक्षेच्या मंजुरीची वाट पाहात आहोत. 5 / 7 त्यामुळे याबाबतची अधिक अपडेट ही पुढच्या आठवड्यापर्यंत देता येईल, असे प्राध्यापक गुप्ता यांनी सांगितले. आपल्यासोबत एकूण १६ जणांचा स्टाफ या क्लिनिकल ट्रायलचं निरीक्षण करेल असे प्राध्यापक गुप्ता यांनी सांगितले. 6 / 7ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या १७ जागांमध्ये पीजीआयएमईआर या संस्थेचा समावेश आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ एस्ट्राजेनेकासोबत भागीदारी करून ही लस विकसित करत आहे. आता या लचीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सदर लसीची निर्मिती आणि वितरणाचे काम पुण्यातील सीरम इंस्टिट्युट करणार आहे. 7 / 7 सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था देशातील सर्वात मोठा लस निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इंस्टिट्युने या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस विकसित होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, रशियानेसुद्धा आपली कोरोनावरील लस स्पुटनिक V ही पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असे सांगितले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications