coronavirus survival on meat and frozen food items reinfection of covid
CoronaVirus News : चिंताजनक! 'या' गोष्टींवर महिनाभर जिवंत राहू शकतो 'कोरोना'; पुन्हा इन्फेक्शनचाही मोठा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:58 PM1 / 17जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गंभीर परिस्थिती आहे. 2 / 17कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 56 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 567,275,561वर पोहोचली आहे. तर 6,387,063 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 17कोरोना व्हायरसचा अभ्यास करणार्या संशोधकांच्या टीमला असे आढळून आले आहे की, 2019 च्या अखेरीस दिसलेल्या SARS-CoV-2 विषाणूचे स्वरूप आता अनेक प्रकारे बदलले आहे. कोरोना विषाणू आता पूर्वीपेक्षा अधिक संक्रमक झाला आहे.4 / 17काही विशिष्ट परिस्थितींमध्ये दीर्घकाळ जिवंत राहण्याची क्षमता आहे. युरोपसह भारतात काही महिन्यांत वाढलेल्या संसर्गाचे हे प्रमुख कारण म्हणून तज्ञ पाहत आहेत. तज्ज्ञांनी व्हायरसच्या स्वरूपातील या बदलामुळे खूप आव्हानात्मक परिस्थिती उद्भवू शकते, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे. 5 / 17कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांतील रिसर्चमध्ये कोरोना व्हायरस पृष्ठभागावर केवळ काही मिनिटे टिकून राहू शकतो असं म्हटलं होतं तर दुसरी लाट येईपर्यंत, व्हायरस हवेत राहू शकतो की नाही? याची पुष्टी झालेली नव्हती. 6 / 17म्युटेशननंतर उदयास आलेल्या व्हेरिएंटबद्दल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, काही परिस्थितींमध्ये कोरोना अनेक गोष्टींवर 30 दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो, याशिवाय हवेतील व्हायरसमुळे घरातील संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाला हलके घेण्याची चूक महागात पडू शकते.7 / 17अप्लाइड अँड एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, शास्त्रज्ञांनी नोंदवले की हा व्हायरस एका महिन्यापेक्षा जास्त काळ फ्रोजन आणि रेफ्रिजरेटेड मीटवर सक्रीय असतो. 8 / 17प्रोफेसर बेली म्हणतात, दक्षिणपूर्व आशियामध्ये कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनची कारणे शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले, या भागात फ्रोजन मीटचा वापर जास्त आहे. या रिपोर्टमध्ये असे सूचित केले आहे की पॅक्ड मीट उत्पादने त्या भागात व्हायरसचा स्रोत असू शकतात. 9 / 17कोरोना व्हायरसच्या स्वरूपातील बदलामुळे त्याचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही वाढत आहे. आतापर्यंत, अभ्यासात असे मानले जात होते की एकदा संसर्ग बरा झाल्यानंतर 12 आठवड्यांपर्यंत पुन्हा संसर्ग होण्याचा धोका नाही.10 / 17अलीकडील रिसर्चमध्ये संशोधकांनी असे म्हटले आहे की नवीन व्हेरिएंट्समुळे हा कालावधी आता 28 दिवसांवरून कमी झाला आहे. म्हणजेच जर तुम्हाला एकदा संसर्ग झाला असेल तरी महिन्याभरात तुम्ही पुन्हा व्हायरसला बळी पडू शकता.11 / 17न्यू साउथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बर्याच भागांमध्ये अशीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की आमच्याकडे अद्याप तुलना नाही, परंतु BA.4 आणि BA.5 सारख्या ओमायक्रॉन सब व्हेरिएंटमुळे संसर्ग झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 17काही देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून देश सध्या सातव्या लाटेशी झुंज देत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांच्या आकडेवारीने विक्रम केला आहे. 13 / 17जिजी न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, 24 तासांत 1,10,000 नवे संक्रमित आढळले आहेत. कोरोनाच्या सातव्या लाटेचा सामना करत असताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी गुरुवारी देशातील जनतेला साथीच्या आजाराबाबत जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले. 14 / 17जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरिंएंटमुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओनेही चिंता व्यक्त केली की आता अनेक देश कोरोनाबाबत हलगर्जीपणा करत आहे. 15 / 17जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाला आहे. काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेली परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. 16 / 17बदलत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेपासून सावध राहा असं WHO नं आवाहन केले आहे. WHO चे प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आता आपल्याला कोरोनाच्या नव्या लाटेसाठी सज्ज राहावं लागणार आहे. जे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. त्याचे प्रत्येकाचे स्वरुप बदललेले आहे. 17 / 17जास्त वेगाने संक्रमित होताना पाहायला मिळत आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात संक्रमित रुग्णांची संख्या वाढेल तितके रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन प्रत्येक देशाने त्यांच्याकडे एक एक्शन प्लॅन तयार ठेवायला हवा अशी सूचना त्यांनी केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications