coronavirus: लक्षणे दिसताहेत पण टेस्ट निगेटिव्ह येतेय? कोरोना चाचणी करतेवेळी घ्या अशी खबरदारी By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 3:16 PM
1 / 8 कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण आणि लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र कोरोनाची लक्षणे दिसत असूनही काही लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी करताना काही गोष्टींबाबत खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. 2 / 8 आयोग्य व्यवस्थेच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची अनेक सामान्य लक्षणे आहेत. त्यामध्ये ताप, अंगदुखी, वास आणि चव जाणे, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय डोळे लाल होणे. जुलाब आणि कानासंबंधीच्या समस्या अशीही लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करावी. 3 / 8 तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर कुटल्याही व्यक्तीला कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक अवधी लोटला असेल. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील. तर रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी करण्याची गरज नसेल. 4 / 8 कोरोनाची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी हा उत्तम पर्याय आहे. रॅपिट अँटिजन टेस्ट कोरोनाचा रिपोर्ट त्वरित देते. मात्र जर रॅपिड अँटिजन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह दिसत असेल आणि तरीही रुग्णामध्ये लक्षणे दिसत असतील तर आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. 5 / 8 सीटी स्कोअर आणि सीटी व्हॅल्यू या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. आरटी-पीसीआरमध्ये सीटी व्हॅल्यूचा अर्थ सायकल थ्रेशहोल्ड व्हॅल्यू होय. तो रुग्णामधील विषाणूच्या प्रभावाचा एक मापक आहे. सीटी व्हॅल्यू जितका कमी असेल तितका रुग्णाला धोका कमी असतो. 6 / 8 कोरोनाची लक्षणे दिसल्यावर डॉक्टर काही रुग्णांना छातीचा सीटी स्कॅन करायला सांगतात. सीटी स्कॅनमध्ये अधिक सीटी स्कोअर दिसत असेल तर ते कोरोनाच्या संसर्गाचा अधिक धोका असल्याचे संकेत असतात. 7 / 8 आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही कुठल्याही बाधिक व्यक्तीपासून ६ फुटांपेक्षा कमी अंतरावर सुमारे १५ मिनिटे संपर्कात राहिल्यास तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाधित व्यक्तीपासून दूर राहा. बाहेर जाण्यापूर्वी मास्क वापरा. तसेच आल्यावर हात चांगल्या प्रकारे सॅनिटाइझ करून घ्या. 8 / 8 जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर होम क्वारेंटाइन किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती व्हा. घरामध्ये मुले आणि आजारी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका. आणखी वाचा