शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: म्हणून ओमायक्रॉनच्या रुग्णांना कोरोनाच्या इतर रुग्णांपासून ठेवलं जातंय वेगळं, तज्ज्ञांनी सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 6:04 PM

1 / 5
देशामधील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत देशाच्या विविध भागात मिळून ९० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन हा ७० पट अधिक संसर्गजन्य असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
2 / 5
कोरोनाच्या व्हेरिएंटच्या संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. नव्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी दिल्लीच नाही तर जयपूरसह अनेक राज्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड वॉर्डपासून ओमायक्रॉनच्या रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. वेगळे ओमायक्रॉन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, तज्ज्ञांनी कोविडच्या रुग्णांपासून ओमायक्रॉनच्या रुग्णांना वेगळे ठेवण्यामागचे महत्त्वपूर्ण कारण सांगितलं आहे.
3 / 5
दिल्ली सरकारच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट आहे. तर त्याच्या प्रसाराबाबत अंदाज वर्तवताना तो आतापर्यंतच्या सर्व व्हेरिएंटच्या तुलनेत सर्वात वेगाने पसरत आहे. तेच कारण आहे की, याबाबत खूप खबरदारी घेतली जात आहे.
4 / 5
तसेच ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत अधिक माहिती मिळावी यासाठी ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच हा व्हेरिएंट कुठल्या वयाच्या लोकांमध्ये किती परसत आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
5 / 5
डॉ. सुरेश यांनी सांगितले की, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये आधीच्या व्हेरिएंटपेक्षा कोणती नवी लक्षणे दिसून येताहेत, यावर लक्ष ठेवणे हे ओमायक्रॉनच्या रुग्णांना वेगळे ठेवण्यामागचे अजून एक कारण आहे. तसेच हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे रुग्णांनाच नाही तर रुग्णांची देखभाल करत असलेले कर्मचारी, कुटुंबीय आणि संपर्कात आलेल्या कुठल्याही नव्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांना वेगळे आणि निरक्षणाखाली ठेवले जाते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारतHealthआरोग्य