Coronavirus: Those who did not obey the law had to be beaten by police mac
Coronavirus: ए पकड! अत्यावश्यक काम नसतानाही घराबाहेर पडताय?; मग 'हे' फोटो नक्की पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:08 PM1 / 9कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 21 दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री 8 वाजता केली. मात्र महाराष्ट्र, तेलंगणा यांच्यासह अन्य काही राज्यांनी याआधीच लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरी देखील नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन न करत घराबाहेर निघत असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे पोलिसांनी देखील त्यांना चांगलीच अद्दल घडवल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.2 / 9पोलीस प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडण्याचं कारण विचारत होते. मात्र कोणतेही अत्यावश्यक काम नसताना लोक बाहेर पडले होते. त्यांना पोलिसांनी शिक्षा देऊन घरी जाण्यास सांगितले.3 / 9उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांनी दोन मित्रांना एकमेकांचे कान पकडून उठाबशा काढायला लावल्याचे दिसून आले.4 / 9अनेक ठिकाणी पोलिसांनी रस्त्यांवर फिरणाऱ्या तरूणांना भन्नाट शिक्षा दिली.5 / 9संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या बाईकस्वारांना काठीने चांगली शिक्षा दिली.6 / 9संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या बाईकस्वारांना काठीने चांगली शिक्षा दिली.7 / 9घरी राहा, कुटुंबांची काळजी असं आवाहन देखील पोलिस वारंवार करत होते.8 / 9देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 560 वर गेली असून, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 46 जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे.9 / 9 महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले 105 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये 41 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications