शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात १ लाख ६१ हजार ३८६ नवे रुग्ण; पॉझिटीव्हीटी दर हा ९.२६ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 10:47 AM

1 / 5
गेल्या २४ तासांत देशभरात १ लाख ६१ हजार ३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाबा म्हणाजे, मंगळवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या 3.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
2 / 5
गेल्या दिवसभरात २ लाख ८१ हजार १०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच देशातील कोरोनाचा दैनंदिन सकारात्मकता दर आता ९.२६ टक्क्यांवर आहे.
3 / 5
आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे १६४.८९ कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे ११.४८ कोटी पेक्षा जास्त डोस आहेत.
4 / 5
राज्यात १४,३७२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ९४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३०,०९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७३,९७,३५२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३% एवढे झाले आहे. राज्यात १,९१,५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 / 5
सध्या राज्यातील मृत्युदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ७,४७,८२,३९१ नमुन्यांपैकी १०.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १०,६९,५९६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २,७३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,३५,४८१ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ७०५ इतका आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत