CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण; ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 09:59 IST
1 / 5देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. 2 / 5गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ३५ हजार ५३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 3 / 5गेल्या दिवसभरात ३ लाख ३५ हजार ९३९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या २० लाख ०४ हजार ३३३ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहे. 4 / 5महाराष्ट्रात शुक्रवारी २४ हजार ९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ७६ लाख ५५ हजार ५५४ झाली आहे. तर, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५८६ आहे. राज्यभरात शुक्रवारी ४५ हजार ६४८ कोविड रुग्ण बरे झाले आहेत. 5 / 5आतापर्यंत ७२ लाख ४२ हजार ६४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत; तर, आजच्या १०३ जणांच्या नोंदीसह आतापर्यंतच्या मृतांचा आकडा १ लाख ४२ हजार ४६१ आहे. शुक्रवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४१ लाख ६३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६ लाख ५५ हजार ५५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ६१ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. ३ हजार २०० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.