शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ५१ हजार २०९ नवे रुग्ण; ६२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:41 AM

1 / 5
देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.
2 / 5
गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५१ हजार २०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे.
3 / 5
आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २१ लाख ५ हजार ६११ इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ९२ हजार ३२७ झाली आहे.
4 / 5
गेल्या २४ तासांत ३ लाख ४७ हजार ४४३ लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ८० लाख २४ हजार ७७१ लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
5 / 5
दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कायम असताना दुसऱ्या लाटेत धोकादायक ठरलेला आजार परतला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला असताना म्युकरमायकोसिसचा (ब्लॅक फंगस) धोका वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसनं अनेकांचा बळी घेतला होता. म्युकरमायकोसिसमुळे अंधत्व येण्याचा, अवयव निकामी होण्याचा, उतीचं नुकसान होण्याचा धोका असतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र