शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ९ हजार ९१८ नवे रुग्ण; पॉझिटीव्हीटी दर हा १५.७७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:25 AM

1 / 5
देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.
2 / 5
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांमध्ये देशात २ लाख ९ हजार ९१८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात १८ लाख ३१ हजार २६८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा १५.७७ टक्के इतका झाला आहे.
3 / 5
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ९५९ जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, २ लाख ६२ हजार ६२८ जणांनी कोरोनाच्या आजारावर मात केली आहे. देशात १,६६,०३,९६,२२७ जणांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.
4 / 5
महाराष्ट्रात रविवारी २२ हजार ४४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर ३९,०१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१४ टक्के इतका झाला आहे. रविवारी राज्यात ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
5 / 5
राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा आहे. राज्यात २,२७,७११ इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,०५,९६९ इतकी आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत