शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: देशात नव्या ३८ हजार १६४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:14 PM

1 / 6
देशभरात गेल्या २४ तासांत ३८ हजार १६४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४९९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख २१ हजार ६६५ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
2 / 6
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ३८ हजार ६६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०३ लाख ०८ हजार २२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 / 6
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. रविवारी ५,७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ९,००० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 / 6
राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.०४ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख ३ हजार ४८६ रुग्ण सक्रिय आहेत.
5 / 6
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,१४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,०६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
6 / 6
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे सरकारने अद्यापही सर्व निर्बंध शिथिल केलेले नाहीत. दुसऱ्या लाटेतून धडा घेतल्याने सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत