शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: देशात नव्या ३८ हजार ९४९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:41 AM

1 / 7
देशभरात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ३० हजार ४२२ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
2 / 7
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४० हजार ०२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०१ लाख ८३ हजार ८७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 / 7
राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांच्या आसपास स्थिर झाली आहे. त्यात फारशी घट होत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात ८ हजार १० नव्या रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ इतकी झाली आहे.
4 / 7
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ७ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ७ हजार २०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.
5 / 7
आतापर्यंत १ लाख २६ हजार ५६० जण कोरोनामुळे दगावले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४८ लाख २४ हजार २११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ८९ हजार २५७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८१ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर ४ हजार ४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
6 / 7
मुंबईत गुरुवारी ५४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर अवघा ०.०७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ९४८ दिवसांवर पोहोचला आहे.
7 / 7
आतापर्यंत मुंबईत सात लाख २९ हजार ७९५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख चार हजार ७६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६६७ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार १२ सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी आठ रुग्णांना सहव्याधी होत्या. दिवसभरात ३६ हजार ५६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७६ लाख ६५ हजार ३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस