शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: देशात नव्या ४१ हजार ५०६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:13 AM

1 / 7
देशभरात गेल्या २४ तासांत ४१ हजार ५०६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ९४ हजार ४५६ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ५४ हजार ११८ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
2 / 7
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४१ हजार ५२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ९९ लाख ७५ हजार ०६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 / 7
राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात ६ हजार ०२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.०५ टक्क्यांवर गेला आहे. तर, शनिवारी राज्यात एकूण ८ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
4 / 7
राज्यात शनिवारी ८ हजार २९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ६ हजार ०२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण १ लाख १४ हजार इतकी आहे.
5 / 7
दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी ३८ लाख १३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ४९ हजार २६४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ५ लाख ८५ हजार ५८० जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ७३७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
6 / 7
शनिवारी मुंबईत दिवसभरात ५०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ९०९ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत सात लाख २७ हजार १४१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख एक हजार ७१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६१२ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ४८४ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी नऊ रुग्णांना सहव्याधी होत्या.
7 / 7
मृतांमध्ये पाच पुरुष, तर आठ महिला रुग्णांचा समावेश होता. आठ मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर पाच रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३७ हजार ३६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७४ लाख ९९ हजार ५९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत