1 / 6देशभरात गेल्या २४ तासांत ४४ हजार १११ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.2 / 6आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५७ हजार ४७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 / 6गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं चढउतार दिसून येत आहे. शुक्रवारी राज्यात साडेआठ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे राज्यात आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 4 / 6राज्यात शुक्रवारी ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ८,३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १५६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या १, १६,८७६ सक्रिय रुग्ण असून आता रुग्ण बरे होण्याचा दर ९६.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. 5 / 6 आजपर्यंत ५८,३६,९२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा मृत्यूदर २.०१ टक्के आहे. तर शुक्रवारी राज्यातील ३४ शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 6 / 6मुंबईत गेल्या चोवीस तासांत ६७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ५४६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ८,५९८ रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७४४ दिवस इतका झाला आहे.