शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: देशात नव्या ४४ हजार २३० कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:17 PM

1 / 7
देशभरात गेल्या २४ तासांत ४४ हजार २३० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ०५ हजार १५५ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
2 / 7
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४२ हजार ३६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०७ लाख ४३ हजार ९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 / 7
राज्यात गुरुवारी दिवसभरात ११ हजार १२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६० लाख ७५ हजार ८८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सध्या ७८ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
4 / 7
राज्यात गुरुवारी ७ हजार २४२ रुग्ण व १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख ९० हजार १५६ झाली असून, बळींचा आकडा १ लाख ३२ हजार ३३५ आहे.
5 / 7
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७५ लाख ५९ लाख ९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८७ हजार ७०४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार २४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
6 / 7
मुंबईत सध्या पाच हजार २०१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे, तर २२ ते २८ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०५ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४०५ दिवसांवर आला आहे.
7 / 7
मुंबईत गुरुवारी ३४० रुग्णांचे निदान झाले असून, १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या सात लाख ३५ हजार ५०५ झाली आहे. बळींची संख्या १५ हजार ८०८ झाली आहे. दिवसभरात ४०३ रुग्ण बरे झाले असून, सात लाख १२ हजार १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन पाच असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील तीन हजार ३४४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई