शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात ७१ हजार ३६५ नवे रुग्ण; पॉझिटीव्हीटी दर हा ४.५४ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:24 AM

1 / 5
देशातील प्राणघातक कोरोना व्हायरस साथीच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ७१ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १२१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 / 5
देशातील दैनिक सकारात्मकता दर आता ४.५४ टक्के आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २४ लाख १० हजार ९७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
3 / 5
दरम्यान, राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. यापैकी दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या ११ हजारावर पोहोचली होती. या दरम्यान दिवसाला सर्वाधिक १६०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागला, तर तिसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या २० हजारांवर पोहोचली.
4 / 5
मात्र यादरम्यान सर्वात कमी ३०० ते ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कमी प्रमाणात ऑक्सिजन लागत होता, आता ही मागणी घटली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
5 / 5
कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीला ऑक्सिजनची मागणी ९०० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली होती. एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यावेळी ऑक्सिजनची रोजची मागणी १,६०० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली होती. ती गेल्यावर्षी २१ डिसेंबरपासून तिसरी लाट सुरू झाली. यात ६ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान रोजची रुग्णसंख्या २० हजारांवर गेली. या तिसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची रोजची मागणी ३०० ते ४०० मेट्रिक टन इतकी होती, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस