शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 11:05 AM

1 / 5
देशभरात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
2 / 5
आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 39 लाख 88 हजार 797 इतकी झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 7 हजार 19 इतकी झाली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे 10 हजार 549 नवे रुग्ण आढळले होते.
3 / 5
देशातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी 98.34% इतका झाला आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेटही घसरलाय. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.86% इतका झाला आहे.
4 / 5
गेल्या 24 तासात 852 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 34 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय, 665 रुग्णांनी आज कोरोनावर मात केलीय. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे.
5 / 5
राज्यातील कोरोनामुक्तांच्या संख्यानं 64 लाख 80 हजार 61 चा टप्पा गाठलाय. राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झालाय.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस