शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात ८३ हजार ८७६ नवे रुग्ण; पॉझिटीव्हीटी दर हा ७.२५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 10:11 AM

1 / 5
गेल्या २४ तासांत देशभरात ८३ हजार ८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 / 5
दिवसभरात १ लाख ९९ हजार ५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा सकारात्मक दर आता ७.२५ टक्क्यांवर आला आहे.
3 / 5
राज्यात रविवारी ९,६६६ नवीन रुग्णांचे निदान आणि ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दिवसभरात २५,१७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ७५,३८,६११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १,१८,०७६ रुग्ण उपचाराधीन आहेत.
4 / 5
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६० टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्युदर १.८३ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासलेल्या ७,५५,५४,७९८ नमुन्यांपैकी १०.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ७,२४,७२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २,३९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,०३,७०० झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ७४ इतका आहे.
5 / 5
राज्यात रविवारी एकाही ओमायक्रॉन बाधिताची नोंद झाली नाही, तर आजपर्यंत एकूण ३३३४ ओमायक्रॉन बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २०२३ रुग्णांना त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ७०१४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांपैकी ६८५५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस