शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: दिलासा! देशात गेल्या ९१ दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 9:35 AM

1 / 7
भारतात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनाचे ४२,६४० नवे रुग्ण समोर आले तर, १,१६७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ९१ दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७९ दिवसानंतर प्रथमच सात लाखाच्या (६,६२,५२१) खाली आली आहे.
2 / 7
देशात आता कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २,९९,७७,८६१ झाली आहे. कोरोना विषाणूने देशभरात आतापर्यंत ३,८९, ३०२ जणांचा बळी घेतला आहे तर, ६८ दिवसात प्रथमच रुग्णसंख्या घटून १,१६७ झाली आहे.
3 / 7
सोमवारी देशात ८६.१६ लाख लोकांचे लसीकरण झाले. एका दिवसात लसीकरणाचा हा झालेला जागतिक विक्रम आहे. भारतात आतापर्यंत २८.८७ कोटी लोकांचे मोहिमेत लसीकरण झाले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण बाधितांच्या संख्येत २.२१ टक्के आहे तर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.४९ टक्के आहे.सलग ४० दिवस नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे तर, मृत्यूदर १.३० टक्क्यावर उतरला आहे
4 / 7
दरम्यान, राज्यात मंगळवारी ८,४७० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, १८८ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 / 7
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१ झाली असून, बळींचा आकडा १,१८,७९५ झाला आहे. सध्या १,२३,३४० रुग्ण उपचाराधीन आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
6 / 7
राज्यात ९,०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९ टक्के एवढे झाले असून मृत्युदर १.९८ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.०१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
7 / 7
मुंबईत मंगळवारी ५७० कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईत ७,२२,४६१ जणांना कोराेनाची बाधा झाली असून १५,३१५ जणांचा मृत्यू झाला. असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सहा लाख ९० हजार ४१७वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या १४,४५३ सक्रिय रुग्ण आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस