1 / 13देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६६ हजार १६१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३७५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच, ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा आकडा इतर दिवसाच्या तुलनेत कमी असल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. 2 / 13केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७ इतकी आहे. 3 / 13गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे.4 / 13घरी राहून कोरोनावर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. ही नवीन नियमावली नेमकी कसी आहे, जाणून घ्या...5 / 13गृह विलगीकरणातील रुग्णासाठी खोलीली संलग्न- स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा पाहिजे. 6 / 13इतर आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी.7 / 13रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा. 8 / 13विलगीकरणात पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती असावी. 9 / 13रुग्ण राहत असलेल्या खोलीत भरपूर हवा खेळती राहिली पाहिजे. 10 / 13रुग्णांनी घरात असतानाही तीन पदरी वैद्यकीय मास्क वापरला पाहिजे. ८ तासांनंतर हा मास्क बदलणे आवश्यक असणार आहे. 11 / 13रुग्ण राहत असलेल्या खोलीतील टेबलचा पृष्ठभाग, दाराच्या कड्या, हँडल यासारख्या गोष्टी फिनाइल याने स्वच्छ करणे गरजेचं असणार आहे. 12 / 13गृह विलगीकरणात १० दिवस राहिल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपले. 13 / 13रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेऊ शकते.