CoronaVirus Updates:reports 42,015 new corona cases and 3,998 deaths in the last 24 hours in india
CoronaVirus Updates: ...अन् अचानक देशातील कोरोना मृतांचा आकडा चौपट वाढला; महाराष्ट्राचा वाटा मोठा By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:31 AM1 / 7देशभरात गेल्या २४ तासांत ४२ हजार ०१५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३९९८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ०७ हजार १७० कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.2 / 7आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ३६ हजार ९९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 / 7महाराष्ट्रातील कोरोनाच्या आकडेवारीत तफावत होती. राज्य शासनाने ती सुधारल्यानंतर बुधवारी ३५०९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे देशभरातील कोरोनामुळे मृत झालेल्या आकड्यात मोठी वाढ झाली, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.4 / 7राज्यात मंगळवारी दिवसभरात ७ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के झाले असून, सध्या ९४ हजार ५९३ रुग्ण उपचाराधीन आहेत.5 / 7राज्यात मंगळवारी ६ हजार ९१० रुग्णांचे निदान झाले असून आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५८ लाख ४६ हजार १६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.५९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ३५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.6 / 7सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६२ लाख २९ हजार ५९६ झाला असून, बळींची संख्या १ लाख ३० हजार ७५३ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १४७ मृत्यूंमध्ये मुंबई १०, नवी मुंबई मनपा २, रायगड २३, पनवेल मनपा ४, नाशिक ३, अहमदनगर ६, पुणे ३, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ३, सातारा ३०, कोल्हापूर १६, कोल्हापूर मनपा ७, सांगली १४, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ४, रत्नागिरी १०, औरंगाबाद ३, उस्मानाबाद १, बीड १, अमरावती १, नागपूर मनपा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.7 / 7 मुंबईत १० हजार ६३८, ठाण्यात १२ हजार ५४९, पुण्यात १५ हजार ४२ आणि कोल्हापूर १० हजार १०० रुग्ण उपचाराधीन आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच केवळ १५ रुग्ण उपचाराधीन असल्याची नोंद आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications