CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 13:39 IST
1 / 12आजकाल भारतात कोरोना लशीविषयी बरीच चर्चा आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार कोरोना लस पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत येऊ शकते. 2 / 12लस उपलब्ध झाल्यानंतर देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कोवॅक्सिननंतर आणखी एका दुसऱ्या स्वदेशी कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत.3 / 12भारतीय औषधी कंपनी झायडस कॅडिला यांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी संभाव्य कोरोना लशीसाठी मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत जगात तिस-या क्रमांकावर असलेल्या भारतात संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 4 / 12झायडस कॅडिला यांनी सांगितले की, प्लास्मिड डीएनए लस सुरक्षित मानली जाते. तत्पूर्वी या कोरोना लसीच्या चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. 5 / 12झायडस कॅडिला त्याच्या मानवी चाचण्यांमध्ये 1000 हून अधिक लोकांचा समावेश करणार आहे. यासाठी भारतात अनेक क्लिनिकल रिसर्च सेंटर स्थापन केली गेली आहेत.6 / 12यापूर्वी 2 जुलैला भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' (COVAXIN) नंतर हैदराबादची औषध कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने कोरोना लस बनवण्याविषयी सांगितले होते. 7 / 12ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने झायडस कॅडिलाला लसीच्या मानवी चाचणीस मान्यता दिली आहे. 8 / 12याद्वारे झायडस कॅडिला ही मानवावरील चाचण्यांना परवानगी मिळणारी देशातील दुसरी कंपनी बनली आहे. अलीकडे हैदराबादच्या भारत बायोटेकला अशा प्रकारच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली.9 / 12जर सर्व काही ठीक झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यापासून कोरोनाच्या लशीची घोषणा करू शकतात. 10 / 12आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या भागीदारीतून विकसित केलेल्या या लशीची प्राण्यांवरची चाचणी यशस्वी ठरली आहे. 11 / 12सध्या तिची मानवी चाचणी सुरू आहे. आयसीएमआरने चाचण्याकरिता निवडलेल्या सर्व संस्थांना काटेकोरपणे सूचना दिल्या आहेत. 12 / 12त्याचे पालन निश्चित वेळेत करण्यात यावे जेणेकरून लस लवकरात लवकर सुरू करता येईल. जर ही लस 15 ऑगस्ट रोजी लाँच केली गेली तर जगातील कोरोनाची ही पहिली लस असेल.