coronavirus vaccine vital for life saving in delhi icmr and ncdc chief made big revelation
Corona Vaccine : चिंताजनक! लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; लसीकरणाबाबत सरकारचा मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 9:03 AM1 / 15कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 2 / 15देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. मात्र अद्यापही असे काही लोक आहेत ज्यांच्या मनात लसीबाबत भीती असून ते लसीकरणाला नकार देत आहे. 3 / 15कोरोना लसीकरणाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली असून सरकारने मोठा खुलासा केला आहे. लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना 'काळ' ठरत असल्याचं म्हटलं आहे. पुन्हा एकदा लसीकरणाचं महत्त्व पटवून दिलं आहे.4 / 15कोविडपासून बचाव करायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असल्याचें केंद्र सरकारने सांगितलं आहे. लस घेतली नसेल तर कसा धोका वाढतो, हे सांगण्यासाठी यावेळी दिल्लीतील कोरोना मृत्यूंबाबतचा तपशील देण्यात आला. 5 / 15राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांचे ( NCDC ) संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली व लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली नाही आणि ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशा व्यक्ती 'हाय रिस्क' गटात मोडतात. 6 / 15प्रातिनिधिक स्वरूपात नुसती राजधानी दिल्लीतील आकडेवारी पाहिली तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण लस घेतली नाही असे होते किंवा सहव्याधीग्रस्त होते. ही बाब लक्षात घेता लसीकरणाबाबत टाळाटाळ करू नका, अशी विनंतीच सिंह यांनी केली.7 / 15आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही यावेळी लसीकरणावरच जोर दिला. कोरोना विरोधी लढ्यात लसीकरण हे सर्वात प्रमुख हत्यार ठरलं आहे. त्यामुळे लस घेतली नसेल तर तुम्ही तुमचाच जीव धोक्यात घालत आहात हे स्पष्ट आहे. 8 / 15लस घेतली असेल तर मृत्यूचा धोका खूप कमी होतो हे सिद्ध झाले आहे. ही बाब सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे, असे भार्गव म्हणाले. देशात 95 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे तर 74 टक्के ज्येष्ठ नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. 9 / 15काही राज्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे, असे आवाहन भार्गव यांनी केले. सध्या मुबलक प्रमाणात लससाठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्याबाबतची अडचण येणार नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले. 10 / 15ज्या व्यक्तींना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्यांनी गर्दीत जाणे टाळावे. कोरोनाची लागण होणार नाही यासाठी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. 11 / 15परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात मदत झाली, असे यावेळी आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले. दुसरी लाट पीकवर असताना 7 मे 2021 रोजी 4 लाख 14 हजार 188 रुग्णांची नोंद झाली होती व एका दिवसात 3 हजार 679 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 12 / 15तेव्हा लसीकरणाचे प्रमाण केवळ तीन टक्के इतके होते. आता 21 जानेवारी 2022 रोजी 3,47,254 रुग्णांची नोंद झाली आणि 435 रुग्ण दगावले. अर्थात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात यश आले, असं अग्रवाल यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 15कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी रोग प्रतिकारशक्ती विकसित होते, जी फक्त ओमायक्रॉनच नाही तर डेल्टासह इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते. रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.14 / 15आयसीएमआरने (ICMR) केलेल्या रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन-निर्मित प्रतिकारशक्ती व्हायरसच्या डेल्टा थोपवू शकते. यामुळे डेल्टा पासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.15 / 15डेल्टाचा संसर्ग संपुष्टात येईल, असेही मत रिसर्चमध्ये मांडण्यात आले आहे. या संशोधनात ओमायक्रॉनवर लस बनविण्यावर भर देण्यात आला आहे. AstraZeneca, Moderna, Pfizer यासह इतर अनेक कंपन्या नवी लस बनवण्याच्या तयारीत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications