शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? तज्ज्ञांचा सरकारला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 3:42 PM

1 / 10
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आणि प्रवाशांवर निर्बंध आणून या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रार्दुभाव होणाऱ्या देशांची यादी वाढतच चालली आहे.
2 / 10
ओमायक्रॉनच्या दहशतीमुळे काही देशांनी लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातही पुन्हा लॉकडाऊन लागेल का? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. भारतात कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली होती. तेव्हा कडक लॉकडाऊन लागू केला होता.
3 / 10
आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रोखण्यासाठी पुन्हा भारतात लॉकडाऊनची घोषणा केली जाईल का? त्यावर तज्ज्ञ स्वामी अंकलेश्वर अय्यर सांगतात की, भारतात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास तो निर्णय चुकीचा ठरेल. जर देशात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास देशात गरिबींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते असं म्हटलं जात आहे.
4 / 10
कोरोना व्हायरस खूप घातक आहे. जगातील लाखो लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. परंतु अनेक ठिकाणी आजारामुळे नव्हे तर आरोग्य सुविधेतील कमरतेमुळे लोकांचे जीव गेले. सर्वात जास्त मृत्यू ७० वर्षापेक्षा अधिक वयातील लोकांचा झाला. कोरोना व्हायरस वृद्ध आणि रोगाने पीडित लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
5 / 10
१६ वर्षापेक्षा कमी कोविड रुग्णांचा अल्प मृत्यू दर आहे. तरीही शाळा बंद ठेवल्या आहेत. ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. परंतु गावाकडील गरीब विद्यार्थ्यांना ही सुविधा घेणं शक्य नाही. ५०० दिवसांहून अधिक काळ हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेत.
6 / 10
विविध स्टडीनुसार भारतात २० कोटी लोक लॉकडाऊनमुळे गरिबीच्या जाळ्यात अडकले. कोरोनामुळे मृत्यू याचसोबतच बेरोजगारी, छोटे छोटे व्यवसाय बंद पडले. शिक्षण क्षेत्राचं नुकसान झालं. जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
7 / 10
ओमायक्रॉनचा धोका वाढवा आणि गरज भासलीस तर संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याऐवजी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर लॉकडाऊन केला जाऊ शकतो. लॉकडाऊन काळात शाळा उघडल्या जातील आणि जास्तीत जास्त आर्थिक चक्र सुरु राहणारे व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल असं स्वामी अंकलेश्वर यांनी सांगितले.
8 / 10
आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आणल्याने पर्यटन व्यवसायाचं नुकसान झालं. तरीही व्हायरस देशात प्रवेश करतो. काही देशांनी आफ्रिकेवरुन येणारी उड्डाणं रोखली तरीही यूरोप आणि अमेरिकेत हा व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे भारतातही ओमायक्रॉनचा व्हेरिएंट आढळण्याची शक्यता आहे.
9 / 10
अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात्तम पर्याय आहे. भारतातील ७० टक्के जनतेला लसीचे दोन डोस अद्यापही मिळाले नाहीत. सरकार लसीचा बुस्टर डोस आणि वर्षाला एक डोस आणण्याचा विचार करत आहे. कदाचित एका व्यक्तीला वेगवेगळे लसीचे डोस देणं प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे.
10 / 10
HIV विरुद्ध वापरण्यात येणाऱ्या लसीचे मिश्रण प्रभावशाली ठरले आहे. भविष्यात कोरोना व्हायरसचे किती घातक व्हेरिएंट येतील त्याचा अंदाज बांधता येणार नाही. कुठलीही लस व्हायरसविरोधात १०० टक्के सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे जर व्हेरिएंट येत राहिले तर वारंवार लॉकडाऊन लावलं जाईल का? त्यामुळे आता जगातील अनेक देशांनी कोविडसोबत जगायला हवं असंही तज्ज्ञ स्वामी अंकलेश्वर यांनी सांगितले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन