CoronaVirus : Want to donate blood in lockdown?; Then learn how to make e-pass vrd
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये रक्तदान करायचे आहे?; मग जाणून घ्या, कसा बनवतात ई-पास By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:12 PM1 / 12एप्रिल व मे महिन्यांत शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे नियमित रक्तदाते कमी होतात साहजिकच रक्तसाठ्याचा तुटवडा भासतो. 2 / 12रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. 3 / 12सर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत व गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त हेतूने सहकार्य करावे, असंही आवाहन केलं जातं. 4 / 12लॉकडाऊनमुळे देशभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते जरी समोर आले असले तरी अटी अन् शर्थींमुळे त्यांना रक्तदान करता येत नाही.5 / 12लॉकडाऊनमुळे रक्त देण्याची इच्छा असणारे लोकांनाही रक्त दान करता येत नाही. विशेष म्हणजे बर्याच रुग्णालयात असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना सतत रक्ताची गरज असते. 6 / 12जर कोणाला रक्तदान करण्याची इच्छा असेल तर त्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. केंद्र सरकारनं रक्तदात्यांना कशा पद्धतीनं ई-पास बनवता येईल, याची माहितीच उपलब्ध करून दिली आहे. 7 / 12प्रथम आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर eraktkoshवर सर्च करा आणि https://www.eraktkosh.in/ वेबसाइट उघडा.8 / 12वेबसाइट उघडल्यानंतर खालच्या बाजूला उजवीकडे डोनेट नाऊ असं लिहिलेले दिसेल. त्याचप्रमाणे लाल रंगाच्या बॉक्समध्ये ई-पास लिहिलेलं असेल. त्यावर क्लिक करा किंवा टॅप करा.9 / 12एक नवीन पेज उघडेल. या पेजमध्ये रक्तदान करणार्यचे नाव / फोन नंबर इत्यादी महत्त्वाची माहिती भरावी लागेल.यानंतर पेजच्या तळाशी असलेल्या सेव्हवर क्लिक करा. आपण सेव्ह क्लिक करताच ई-पास तयार होईल.10 / 12जर आपण लखनऊमध्ये राहत असाल तर लॉकडाऊनमध्ये रुग्णालयात जाऊन आपण रक्तदान करू शकता. यासाठी घरबसल्या आपल्या मोबाइलवर ई-पास मिळेल. उत्तर प्रदेश सरकारने रक्त देण्यास इच्छुक असणा-यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला होता. 11 / 12आपल्याला या हेल्पलाइन नंबरवर कॉल किंवा संदेश पाठवावा लागेल. यानंतर रक्तदानासाठी निश्चित केलेल्या तारखेचा पास व्हॉट्सअॅपवर पाठविला जाईल.12 / 12अधिक माहितीसाठी पीजीआय: 0522-2494505, 2494508, 2494500, केजीएमयू : 9415761773 (व्हॉट्सऍप) या नंबरवर संपर्क साधू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications