Coronavirus: What exactly is the hydroxychloroquine that the United States demands of India? Learn
Coronavirus: अमेरिका भारताकडे मागणी करत असलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन नेमकं आहे तरी काय?; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 2:40 PM1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. 2 / 10अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११५० लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३६६००० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ३०००० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत १०७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.3 / 10कोरोनावर मात करण्यासाठी अजूनही कोणतचं अधिकृत औषधाचा शोध लागला नाही. मात्र भारताकडे मोठ्या प्रमाणात साठा असणाऱ्या 'हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन'ची मागणाी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.4 / 10भारत आणि अमेरिकेतल्या संबंधांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन सर्वात महत्त्वाचं औषध बनलं आहे. हे औषध म्हणजे काही कोरोनावरचं अधिकृत औषध नाही. 5 / 10भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा मोठा पुरवठादार आहे, ते मिळावं यासाठी धमकी देण्यापर्यंतही डोनाल्ड ट्रम्प यांची मजल गेली.6 / 10डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारताकडून अपेक्षित निर्णयाची घोषणाही झाली.भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनवरच्या निर्यातीवर जी बंदी आणली होती ती हटवली आहे. देशातल्या मागणीचा आढावा घेऊन पुरेसा साठा असल्याचं लक्षात आल्यावर आपण ही बंदी उठवत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.7 / 10कोरोनाच्या संकटानंतर सर्वच देशांनी आवश्यक औषधांच्या निर्यातीवर बंदी आणली, जागतिक आरोग्य संघटनेचेही तसे निर्देश आहेत. 4 एप्रिलला तर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनवर पूर्ण बंदी आणली. पण याच निर्णयानंतर तिकडे अमेरिकेत त्याची मागणी वाढू लागली होती.8 / 10केवळ अमेरिकाच नव्हे तर श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ यासह 30 देशांना भारताकडून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची गरजेनुसार निर्यात होणार आहे. भारत हा हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा जगातला सर्वात मोठा पुरवठादार आहे. कारण जगात या एकूण औषधापैकी 70 टक्के हे भारतात तयार होतं.9 / 10हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मलेरियासाठी वापरलं जाणारं औषध आहे. हाय रिस्क पॉप्युलेशन म्हणजे कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, पेशंटचे नातेवाईक यांच्यासाठीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते वापरावं असा आयसीएमआरचा स्पष्ट निर्देश आहेत. 10 / 10हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोरोनावरचं औषध नसलं तरी लागण होऊ नये म्हणून ते वापरलं जातं आहे आणि त्याचे काही ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. पण अद्यापही कोरोनावरचं अधिकृत औषध ही मान्यता त्याला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications