शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: धक्कादायक! प्लाझ्मासाठी महिलेने सोशल मीडियावर शेअर केला नंबर, लोकांनी पाठवले अश्लील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 4:12 PM

1 / 8
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. देशात दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. देशभरात लाखो लोक मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीतही काही लोक असंवेदनशीलपणे वागत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार एका महिलेने समोर आणला आहे.
2 / 8
या महिलेने व्हाइस वर्ल्ड न्यूजसाठी लिहिलेल्या आर्टिकलमध्ये लिहिले की, माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाबाधित झाली, तेव्हा आम्ही व्हेंटिलेटरचा शोध घेत होतो. मला सोशल मीडियाचा प्रभाव माहिती आहे. त्यामुळे मी ट्विटरवर मदतीची मागणी करत फोन नंबर शेअर केला. सुदैवाने आम्हाला पुढच्या सहा तासांत व्हेंटिलेटर मिळाला.
3 / 8
काही दिवसांनंतर आम्हाला ए प्लस रक्तगटाच्या प्लाझ्माची गरज भासली. आम्ही त्यासाठी डोनर्सचा शोध सुरू केला. मात्र ही बाब तितकीशी सोपी नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सोशल मीडियावरून मदतीची याचना केली. आम्हाला मदत मिळत नसल्याने माझ्या काही मित्रांनी सोशल मीडिया अकाऊंट्सवर माझ्या व्यथा मांडल्या.
4 / 8
ही महिला लिहिते की, तेव्हा मी काहीशी घाबरली होती. माझा नंबर अशा ठिकाणी टाकण्यात होता जे माध्यम अत्यंत प्रभावी आहे तसेच त्यामुळे अनेक लोकांना माझी वैयक्तिक माहिती मिळू शकते, याची मला चिंता वाटत होती. मात्र तेव्हा माझे प्राधान्य घरातील आजारी व्यक्तींना उपचार मिळवून देण्याचे होते. त्यामुळे या धोक्याकडे मी दुर्लक्ष केले.
5 / 8
मात्र तिथेच माझ्याकडून चूक झाली. मी ब्लड बँक आणि डोनर्ससोबत सातत्याने बोलत होते. मात्र तिथून माझ्या हाती निराशा लागत होती. यादरम्यान मला एक फोन आला. त्या व्यक्तीने मला मी सिंगल आहे का, असे विचारले. त्याचे बोलणे ऐकून मी फोन कट केला. तेव्हा त्याच्यासोबत बोलण्यासाठी वेळ नव्हता.
6 / 8
त्यानंतर असे फोन सातत्याने येऊ लागले. एका व्यक्तीने फोन करून माझा डीपी चांगला असल्याचे सांगितले. काही लोक मी एकटीच राहते का, कुठे राहते, त्यांच्यासोबत बोलेन का, असे चित्रविचित्र प्रश्न विचारू लागले. या सर्व फोनकॉलमुळे मी त्रासून गेले होते. मी हे सर्व नंबर ब्लॉक केले.
7 / 8
मात्र दुसऱ्या दिवसाची सकाळ माझ्यासाठी चिंताजनक ठरली. तेव्हा सात जण मला एकाच वेळी व्हिडीओ कॉल करत होते. माझ्या व्हॉट्सअॅपवर तीन जणांनी आपल्या प्रायव्हेट पार्टचा फोटो पाठवला होता. हे पाहून माझा राग अनावर झाला. सार्वजनिक ठिकाणी नंबर शेअर केल्याने मला अशा समस्यांचा सामना करावा लागेल, याची कल्पना मी केली नव्हती.
8 / 8
मात्र नंतर मी माझा नंबर सर्व पब्लिक अकाऊंट्सवरून हटवला. या संकटाच्या काळातसुद्धा काही लोक सुधरणार नाहीत, याची मला जाणीव झाली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया