बापरे! राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 22:12 IST
1 / 9राजस्थानमधील भरतपूर येथील एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. या महिलेची आतापर्यंत 31 वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली असून या सर्व टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. 2 / 9हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य प्रशासन चिंतेत पडले आहे. हे प्रकरण भरतपूर जिल्ह्याची आहे, येथील बझेरा गावातील महिला पाच महिन्यांपूर्वी एका आश्रमात गेली होती. आश्रमात महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. 3 / 9तेव्हा तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. तेव्हापासून म्हणजेच पाच महिन्यांपासून ही महिला क्वारंटाइन आहे. 4 / 9धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेची आतापर्यंत 31 वेळा कोरोनाची टेस्ट झाली आहे आणि सर्व टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे पाच महिन्यांपासून कोरोना संसर्ग झाल्याने जिल्हा प्रशासनही चिंतेत पडले आहे. 5 / 9आता ही महिला जयपूरला जाण्याची तयारी करत आहे. या महिलेवर होमिओपॅथी पद्धतीनेही उपचार केले जात आहेत. मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. कप्तान सिंग म्हणाले की, असे प्रकरण याआधी बयाना येथील एका मुलामध्ये दिसून आले होते. त्यावेळी त्या मुलाची कोरोना टेस्ट १३ वेळा पॉझिटिव्ह आली होती.6 / 9अनेकवेळा कोरोना व्हायरस आतमध्ये राहतो आणि जोपर्यंत हा व्हायरस शरीरात राहील, तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येईल, डॉ. कप्तान सिंग म्हणाले.7 / 9याचबरोबर, 4 सप्टेंबरला या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि तेव्हापासून पाच महिन्यांत तिची 31 वेळा टेस्ट करण्यात आली. मात्र, सर्व टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. या महिलेला आता 15 दिवसांनंतर जयपूरला उपचारासाठी पाठवले जाईल, या आश्रमातील संचालकांनी सांगितले.8 / 9दरम्यान, सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच, कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. दुसरीकडे, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.9 / 9देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायसरवरील लस देण्यात आली आहे.