Coronavirus : The worlds wealthiest are taking in response to the coronavirus pandemic api
Coronavirus : कोरोनासोबत लढण्यासाठी सेलिब्रिटींनी दिले 8 लाख कोटी रूपये, भारतातून कुणी काय दिलं? By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 2:23 PM1 / 11कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक परेशान झाले आहेत. सरकारही आपल्या पद्धतीने या व्हायरससोबत लढण्याचे प्रयत्न करत आहे. मदतीसाठी आता अनेक श्रीमंत सेलिब्रिटी आणि अनेक संस्था समोर आल्या आहेत. कोरोनासोबत लढण्यासाठी यांनी कोट्यवधी रूपये दान दिले आहेत. 2 / 11वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी तर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तब्बल 100 कोटी रूपये दान करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोना व्हायरसचं औषध तयार करण्याच्या मदतीसाठी 5 कोटी रूपये दान केलेत.3 / 11महिंद्रा अॅन्ड महिंद्रा ग्रुप चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मदतीसाठी पुढाकार घेत घोषणा केली की, ते त्यांचा संपूर्ण पगार दान करतील. तसेच त्यांनी इतरांनाही कोरोनाशी संबंधित फंडसाठी दान करण्याचं आवाहन केलं. 4 / 11पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी ट्विट करून सांगितले की, आपल्या जास्त प्रमाणात भारतीय इनोवेटर्स, संशोधकांची गरज आहे जे व्हेंटिलेटरची कमतरता आणि कोरोनावर योग्य उपाय शोधू शकतील. पेटीएमने यासाठी 5 कोटी रूपये दान केले आहे.5 / 11मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना वॅक्सिन तयार करण्यासाठी आणि आफ्रिका-आशियात उपचारासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी 750 कोटी रूपये देण्याची घोषणा केली. याआधी त्यांनी एक कोटी डॉलर दिलेले आहेत.6 / 11अलिबाबाचे जॅक मा यांनी 100 कोटी रूपये दिले आहेत. त्यांनी कोरोनाची वॅक्सिन विकसित करण्यासाठी 100 कोटी रूपये दिले आहेत. सोबतच त्यांनी अमेरिकेला 5 लाख टेस्टिंग किट आणि 10 लाख फेस मास्क पाठवले आहेत.7 / 11जगभरातील फुटबॉलर्सनी आतापर्यंत 50 कोटी रूपये दान केले आहेत. अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन फंड जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याद्वारे आतापर्यंत 300 कोटी रूपये दान करण्यात आले आहेत.8 / 11इटलीमध्ये सर्वात भयावह स्थिती आहे. इटलीतील 18 श्रीमंतांनी आतापर्यंत कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी 250 कोटी रूपयांपेक्षा जास्त दान दिलं आहे.9 / 11फॅशन लिजेंट अरमानीने मिलान आणि रोममधील हॉस्पिटल्सना 10 कोटींची मदत केली आहे.10 / 11हॉंगकॉंगमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती लि कांग शिंग यांनी वुहानमध्ये मेडिकल वर्कर्ससाठी 98 कोटी रूपये दान केले आहेत. 11 / 11तसेच यूएस पॉस स्टार रिहानाने व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी 10 कोटी रूपये दान केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications